कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सेवानिवृती समारंभ ही साधेपणाने संपन्न


Pandharpur Live - ll
पंढरपूर – रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या सिनिअर विभागातील उपप्राचार्य प्रा बजरंग दाजी रोंगे, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य प्रा. अशोक शिवराम चंदनशिवे, व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमातील प्रा. संपत निवृती सो

नावणे व प्रा. शिवाजी मोहन घाडगे हे सेवक नियत वेळेनुसार महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाले आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक भोईटे यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देवून निरोप देण्यात आला. सत्कार करण्यात आला.

Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!

सध्या देशभरात कोरोना साथीचा प्रादुर्भाव असल्याने मोठ्या स्वरूपातील सर्वच कार्यक्रम बंद आहेत. लोकांची गर्दी होवून या साथीचा प्रसार होवू नये यासाठी खबरदारी घेतली जाते. कोरोनाच्या साथीचा प्रभाव ही सेवकांच्या निवृत्ती समारंभावर होत आहे. मे अखेरीस सेवानिवृत्त झालेल्या सेवकांचा निवृत्ती समारंभ अतिशय साध्या पद्धतीने घेण्यात आला. सेवानिवृती समारंभ अतिशय साध्या स्वरुपात घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

प्रा. बजरंग दाजी रोंगे यांनी इंग्रजी या विषयाचे सलग ३३ वर्षे अध्यापन केले असून डी.पी.भोसले कॉलेज कोरेगाव, डी.जी.कॉमर्स कॉलेज सातारा, आर.बी.एन.बी.कॉलेज श्रीरामपूर व के.बी.पी.महाविद्यालय पंढरपूर या ठिकाणी सेवा केली आहे. प्रा अशोक चंदनशिवे यांनी ३२ वर्षे वनस्पतीशास्त्र विषयाचे अध्यापन केले असून श्री सद्गुरू गंगागिरी महाराज कॉलेज कोपरगाव, आर.बी.एन.बी.कॉलेज श्रीरामपूर, शरदचंद्रजी पवार महाविद्यालय लोणंद, दादा पाटील महाविद्यालय कर्जत व के.बी.पी.महाविद्यालय पंढरपूर या ठिकाणी सेवा केली आहे. तर व्यवसाय शिक्षण विभागातील प्रा. संपत सोनवणे यांनी सलग ३२ वर्षे सेवा के.बी.पी.महाविद्यालयात केली आहे. प्रा. शिवाजी घाडगे यांनी खानापूर शिरसगाव व शेवटी पंढरपूर येथे सेवा केली असून सलग ३२ वर्षे सेवा केली आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंखे हे उपस्थित होते. या समारंभास कॉमर्स विभागाचे उपप्राचार्य डॉ. निम्बराज तंटक, विज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ सुरेश पाटील, कला विभागाचे अधिष्ठाता डॉ. तानाजी लोखंडे, इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. चंद्रकांत रासकर, इतिहास विभाग प्रमुख डॉ. हनुमंत लोंढे, प्रा. राजेंद्र मोरे, हनुमंत खपाले, सुखदेव जाधव, अभिजित जाधव आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी कल्याण मंडळाचे प्रमुख डॉ सुखदेव शिंदे यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार डॉ मारुती सातपुते यांनी मानले.