स्वेरीज फार्मसी महाविद्यालयाच्या वतीने वेबीनार्स संपन्न - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

Wednesday, 10 June 2020

स्वेरीज फार्मसी महाविद्यालयाच्या वतीने वेबीनार्स संपन्न


Pandharpur Live - ll पंढरपूर -कोरोना या जागतिक महामारीमुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत स्वेरी संचलित  फार्मसी महाविद्यालयातर्फे फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध विषयावर वेबिनार आयोजन करण्यात आले होते. सध्या लॉक डाउनच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या भवितव्यासाठी लागणाऱ्या विविध कौशल्यांसाठी आणि बौद्धिक विकासासाठी ऑनलाइन उपक्रम राबवले जात आहेत. 
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!

याचाच एक भाग म्हणून फार्मसी मधील विद्यार्थ्यांना 'ई फार्मसी चॅलेंजेस अँड अपॉर्च्युनिटीज  इन इंडिया' या विषयावर सुनील ठाकूर, असिस्टंट मॅनेजर, मेडिकल अफेअर्स यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी औषधनिर्माण शास्त्रातील विविध प्रकारची आव्हाने आणि संधी याबाबत संपूर्ण माहिती देत मोलाचे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना 'कॉलिटी बाय डिझाईन' या विषयावर अखिलेश कासलीवाल, रिकट सायंटिस्ट ग्लेनमार्क, अहमदाबाद यांनी देखील  मार्गदर्शन केले. एखाद्या नवीन औषधाची निर्मिती  करताना उपयुक्त ठरणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. हे वेबिनार्स झूम या ॲपच्या माध्यमातून घेण्यात आले.  संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, प्राचार्य डॉ.अमित गंगवाल आणि प्रा.प्रदीप जाधव यांनी हे वेबीनार्स यशस्वीरित्या संपन्न केले.

Ad