Pandharpur Live Video News- कोर्टी येथील शांतीनिकेतन गुरुकुलचा अनोखा उपक्रम ‘‘शिक्षण आपल्या दारी’’ विद्यार्थ्यांच्या गावात जावुन शिक्षण देणार संस्थेतील सर्व शिक्षक


Pandharpur Live -
कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर सॅनिटायझर, मास्क, 
सोशल डिस्टन्स व थर्मल मशिनचा होणार वापर 

पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथील शांतीनिकेतन गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष डी. यु. कोंडलकर यांच्या  ‘शिक्षण आपल्या दारी’ या संकल्पनेतून संस्थेचे विविध विषयांचे  शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या गावात जावुन शिक्षण देणार आहेत. 
 कोविड-90 च्या पार्श्‍वभुमीवर संस्थेने गेतलेल्या या निर्णयाचे पालकांमधुन व विद्यार्थ्यांमधुन स्वागत करण्यात येत आहे. 

यासाठी ग्रामीण भागातील 1 ते  दीड किलोमिटरच्या अंतरावरील कमीतकमी 10 विद्यार्थ्यांचा व जास्तीतजास्त 20 विद्यार्थ्यांचा गट तयार करण्यात येणार आहे. हे करत असताना कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर अत्यावश्यक त्या सर्व  बाबींची खबरदारी घेतली जाणार आहे. सॅनिटायझर, थर्मल मशिन्स, सोशल डिस्टन्स याचा अवलंब करुन हे शिक्षण देण्यात येईल अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डी.यु. कोंडलकर यांनी पंढरपूर लाईव्हशी बोलताना दिली.

Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!