पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे आवारात वृक्षारोपन करुन केला पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांचा सन्मान... पंढरपूर लाईव्ह च्या ग्रामीण टीमकडून ‘आंतरिक सेवा सुरक्षा पदक’ जाहीर झाल्याबद्दल श्री. भस्मे यांना शुभेच्छा!

Pandharpur Live -
नक्षलग्रस्त भागातील सेवेच्या कालावधीत उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल केंद्रीय गृह मंत्रालयाद्वारे पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे विद्यमान पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांना ‘आंतरिक सेवा सुरक्षा पदक’ जाहीर झाल्याबद्दल आज पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या आवारात वृक्षारोपण करुन पंढरपूर लाईव्ह च्या ग्रामीण टीमकडून पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांना शुभेच्छा दिल्या.
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!
सर्वप्रथम पंढरपूर लाईव्हचे मुख्य संपादक भगवान वानखेडे व पंढरपूर लाईव्हचे  ग्रामीण प्रतिनिधी अशोक पवार सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्या हस्ते पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या आवारात ‘कल्पवृक्ष’ म्हणजेच नारळाच्या झाडाचे वृक्षारोपन करण्यात आले.  यानंतर श्री. भस्मे यांचे अभिनंदन करुन त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी श्री. भस्मे यांनी पंढरपूर लाईव्हच्या कार्याचे कौतुक करत वस्तुस्थितीला धरुन ‘पंढरपूर लाईव्ह’ पत्रकारितेचा वसा जोपासत असल्याचे मत व्यक्त केले.

यावेळी तिसंगी चे पोलीस पाटील स्वप्नील लोखंडे,  , महासंघ तालुका अध्यक्ष अविनाश बाबर व अविनाश उघडे, तसेच पोलिस स्टेशनचे पदाधिकारी, श्री. दिवसे, गोपनीय विभागाचे श्री.वाडदेकर आदी उपस्थित होते.