पंढरपूरच्या तहसिलदार डॉ. वैशाली वाघमारे यांचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आला... रुग्णाची तपासणी करताना योग्य ती खबरदारी घेतली असल्याचे स्पष्ट


Pandharpur Live - 

ऐन आषाढी वारीच्या तोंडावरच पंढरपूर शहरातील प्रदक्षिणा मार्गावर एक कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आला होता सदर रूग्णाची आरोग्य तपासणी पंढरपूर च्या तहसिलदार डॉ. वैशाली वाघमारे यांनी केली असल्याचे फोटोही व्हायरल झाले होते, आणि काही प्रसिध्दी माध्यमातून जबाबदार प्रशासकीय अधिकारी तहसिलदार वैशाली वाघमारे यांनी कोणतीही सुरक्षा न बाळगता सदर रूग्णाची तपासणी केली असल्याबाबत विविध प्रश्न उपस्थित केले होते; परंतु आज तहसिलदार डॉ. वैशाली वाघमारे यांची कोरोना टेस्ट निगेटीव्ह आली असल्याने त्यांनी सदर रूग्णाची तपासणी करताना योग्य ती खबरदारी घेतली होती, हे स्पष्ट झाले आहे. 

पंढरीत आढळून आलेला रूग्ण हा एका सहकारी बँकेचा संचालक असुन त्याची तपासणी पंढरपूर च्या तहसिलदार डॉ. वैशाली वाघमारे यांनी स्वतः केली होती व त्यांना क्वारंटाईन केले असल्याचे   वृत्त काही वेब पोर्टल आणि यु-ट्यूब चॅनलवर प्रसिद्ध झाल्यानंतर पंढरपूर लाईव्ह ने तहसिलदार वाघमारे यांना याबाबत विचारणा केली असता त्यांना नेमकी कोणाची तपासणी केली होती हे अद्याप समजले नसल्याचे व अद्याप आपणास क्वारंटाईन होण्याचे कोणतेही आदेश वरिष्ठांकडून प्राप्त झाले नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिल्याने पंढरपूर लाईव्ह वर आम्ही,  "तहसिलदार वाघमारे यांनी निष्काळजीपणाने कुणाचीच तपासणी केली नाही" असे वृत्त प्रसिद्ध केले होते.

यानंतर पंढरीतील आढळून आलेल्या संबंधित कोरोना पॉझिटीव्ह रूग्णाची तपासणी करतानाचा एक फोटो व्हायरल झाला असल्याचे निदर्शनास आले आणि नकळत सदर रूग्णाची तपासणी तहसिलदार वैशाली वाघमारे यांनी केलेली होती हे स्पष्ट झाले.  

वास्तविक तहसिलदार यांनी अनेक महिलांसह सदर रूग्णाची ही तपासणी केलेली होती परंतु व्हायरल झालेल्या फोटोतील रूग्ण नेमका तोच आहे का? याबाबत संभ्रम निर्माण झाल्याने याबाबत पंढरपूर लाईव्ह ने स्पष्टीकरण दिले नव्हते.  याबाबत तहसिलदार यांनाही पुरेशी माहिती नव्हती.  परंतु  वस्तुस्थिती माहिती झाल्यानंतर तहसिलदार यांनी स्वतःहून खबरदारी घेत स्वतःची कोव्हिड टेस्ट करवून घेतली. 

आज त्यांचा कोव्हिड रिपोर्ट प्राप्त झाला असुन तो 'निगेटीव्ह' आला आहे. 

तहसिलदार डॉ. वैशाली वाघमारे यांनी स्वतः डॉक्टर असल्याने त्यांनी रूग्णांची तपासणी करताना आवश्यक ती काळजी घेतली होती. हे याद्वारे अधोरेखित झाले आहे.