कोरोना पार्श्वभूमीवर आज आषाढी वारीकरिता पंढरीत येणाऱ्या 7 चारचाकी व 8 दुचाकी वाहनांसह एकुण 38 भाविकांना पोलिस प्रशासनाने परत पाठवले


Pandharpur Live - 
दि.1.07.2020 रोजी आषाढी एकादशी साजरी होत आहे. जगभर कोरोना विषाणुने थैमान घातले आहे, राज्यात आणि जिल्ह्यात देखील कोरोना संसर्ग झालेले रुग्ण उपचार घेत आहेत, आज पंढरपुर शहरात देखील एक रुग्ण आढळून आला आहे. कोरोनाचे सावट आषाढीवारीवर देखील आहे.पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर भाविक जमले तर आणखी धोका वाढु शकतो हे विचारात घेवुन पालखीवारी देखील रद्द केली आहे.

याच अनुषंगाने पंढरपूरमध्ये भाविकांनी प्रवेश करू नये म्हणुन 24 तास तिन स्तरीय नाकाबंदी चालु केली आहे, तसेच उद्या पासुन संचारबंदी प्रस्तावित आहे. या अनुषंगाने काल रात्री आणी आज दिवसभरात पोलिसांची नजर चुकवून आड मार्गाने आलेल्या 7 चारचाकी, 8 दुचाकीसह एकुण 38 वारकऱ्यांना विनंती करून परत माघारी पाठवले असल्याची माहिती नाकाबंदी चेकिग
 अधिकारी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली आहे. 

सदरची नाकबंदी हि वारी काळामध्ये यापुढेही सलग चालु राहणार असुन भाविकांना पंढरपूरमध्ये बिलकुल प्रवेश दिला जाणार नाही. असे पोलीस विभागाकडून कळविण्यात आले आहे. तसेच भाविकांना कोरोना संसर्ग धोका विचारात घेवुन पंढरपूरला येवु नये असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

पंढरपूर तालुका आणी शहराच्या चोहो बाजुस जी नाकाबंदी लावण्यात आली आहे त्या एकुण सर्व मिळुन पॉईंट वरून परत पाठविण्यात आले आहे. एकादशीला अद्याप दोन दिवस बाकी असल्याने उद्या आणि परवा हि संख्या वाढु शकते, त्यामुळे पोलीस प्रशासन सतर्क आहे.
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!