परळी वैजनाथ- वैद्यकिय अधिक्षक, सर्जन डॉ. रामेश्वर रामकिशन लटपटे यांचे दुःखद निधन

Pandharpur Live - 
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
             उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक, सर्जन डॉ. रामेश्वर रामकिशन लटपटे (वय ५१) यांचे पुणे येथील खाजगी दवाखान्यात उपचारा दरम्यान गुरुवारी (ता.०४) सायंकाळी सहाच्या सुमारास निधन झाले.
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!
          वैद्यकिय अधिक्षक, सर्जन डॉ रामेश्वर लटपटे हे गेल्या महिण्यात हैद्राबाद येथे उपचार घेऊन उपजिल्हा रुग्णालयाचा वैद्यकीय अधिक्षक म्हणुन  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पदभार घेतला. कोरोनाच्या या लढाईत त्यांनी फार मोठे योगदान दिले. परंतु प्रकृती साथ देत नसल्याने उपचारासाठी हैद्राबाद नंतर पुणे येथे उपचार सुरु होते.गुरुवारी (ता.०४) सायंकाळी सहाच्या दरम्यान उपचार सुरू असताना निधन झाले. अनेकांच्या अवघड शस्त्रक्रिया करुन अनेक रुग्णांना जिवदान देणारे डॉ रामेश्वर लटपटे यांचे अकाली निधन परळीकरांसाठी धक्का आहे. डॉ. लटपटे यांच्यावर येथील सार्वजनिक स्मशानभूमीत शुक्रवारी (ता.०५) सकाळी ८.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. डॉ. लटपटे यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.