कोरोनाच्या सावटाखालील सोलापूर जिल्ह्याच्या जनतेसाठी सुखद बातमी - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

Friday, 5 June 2020

कोरोनाच्या सावटाखालील सोलापूर जिल्ह्याच्या जनतेसाठी सुखद बातमी


Pandharpur Live - दररोजचा कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांचा वाढता आकडा पाहुन चिंताग्रस्त असलेल्या, कोरोनाच्या सावटाखालील सोलापूर जिल्ह्यातील जनतेसाठी एक सुखद व दिलासादायक बातमी आहे. ती म्हणजे आज सकाळी आलेल्या कोरोना रूग्णांचे सर्व रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे. 

पंढरपूर तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी यांनी तालुक्यात कोरोनाग्रस्त रूग्ण आढळून आल्याबरोबर कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी तत्परतेने यंत्रणा हलवली, आवश्यक त्या उपाययोजना केल्या आणि याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. पंढरपूर शहर व तालुक्यात बाहेरून येणारे नवीन कोरोना बाधीत रूग्ण नव्याने आढळून आले नाहीत.  प्रांताधिकारी सचिन ढोले,  मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तहसिलदार वैशाली वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ सागर कवडे, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, आरोग्य अधिकारी डॉ.बोधले, तालुका पोलीस निरीक्षक किरण आवचर, ग्रामीण पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, सर्व पोलीस कर्मचारी, सर्व आरोग्य कर्मचारी यांच्यासह पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. साधनाताई भोसले, उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर या सर्वांच्या सकारात्मक नियोजनामुळे अद्याप तरी पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोनाचा अति प्रादुर्भाव रोखणं शक्य झालं आहे. यामध्ये कोरोनाच्या लढ्यात सहभागी असलेल्या सर्वच कोरोना योद्ध्यांचा समावेश आहे.
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!

सोलापूर आजचा अहवाल
 दि.05/06/20 सकाळी 8.00 
आजचे तपासणी अहवाल - 93
पॉझिटिव्ह- 0                                                      (पु. 0  * स्त्रि-0  )
निगेटिव्ह- 93
आजची मृत संख्या- 0  
एकुण पॉझिटिव्ह- 1144
एकुण निगेटिव्ह - 7162
एकुण चाचणी- 8306
एकुण मृत्यू- 99
एकुण बरे रूग्ण- 484

Ad