पंढरीच्या चौफेर कडक नाकाबंदी: आषाढी वारीसाठी आलेल्या 131 वारकरी बांधवांना आज पंढरीच्या वेशीवरून विनंती करून परत पाठवले! - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

Monday, 29 June 2020

पंढरीच्या चौफेर कडक नाकाबंदी: आषाढी वारीसाठी आलेल्या 131 वारकरी बांधवांना आज पंढरीच्या वेशीवरून विनंती करून परत पाठवले!Pandharpur Live- बुधवार दि.1.07.2020 रोजी आषाढी एकादशी साजरी होत आहे. जगभर कोरोंनाने थैमान घातले आहे, राज्यात आणी जिल्ह्यात देखील कोरोना संसर्ग झालेले रुग्ण उपचार घेत आहेत, काल पंढरपुरमध्ये देखील काही रुग्ण सापडले आहेत अशातच कोरोनाचे आषाढीवारीवर देखील संकट आले आहे. पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर भाविक जमले तर आणखी धोका वाढु शकतो हे विचारात घेवुन पायी पालखीवारी देखील रद्द केली आहे.

हि सर्व परिस्थिती विचारात घेवुन पंढरपूरमध्ये भाविकांनी प्रवेश करू नये म्हणुन पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे आणी उप विभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर डॉ. श्री. सागर कवडे यांचे मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका आणी शहराच्या चोहो बाजुस 31 ठिकाणी 24 तास तिन स्तरीय नाकाबंदी आणी पोलीस वाहनांची गस्त चालु आहे. या नाकाबंदी मध्ये पोलीस, होमगार्ड, मंदीर सुरक्षा कमांडो आणी पोलीस मित्र सहभागी आहेत. अशी मा

या अनुषंगाने काल रात्री आणी आज दिवसभरात पोलिसांची नजर चुकवून आड मार्गाने आलेल्या 31 ठिकाणी जी नाकाबंदी लावण्यात आली आहे त्या एकुण सर्व ठिकाणाहून मिळुन 22 चारचाकी, 28 दु-चाकीसह एकुण 131 वारकऱ्यांना विनंती करून परत माघारी पाठवले आहे. अशी माहिती पोलिस नाका बंदी चेकिंग अधिकारी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली.

सदरची नाकबंदी हि वारी काळामध्ये या पुढेही सलग चालु राहणार असुन, संचारबंदी देखील प्रस्तावित आहे यामुळे भाविकांना पंढरपूरमध्ये बिलकुल प्रवेश दिला जाणार नाही असे पोलीस विभागकडून कळविण्यात आले आहे. 

भाविकांना कोरोना संसर्ग धोका विचारात घेवुन पंढरपूरला येवु नये असे आवाहन देखील करण्यात आले आहे. 

एकादशीला अद्याप दोन दिवस बाकी असल्याने उद्या आणी परवा हि संख्या वाढु शकते, त्यामुळे पोलीस प्रशासन सतर्क आहे.

Ad