स्वेरीत राजर्षी शाहू महाराज यांच्या १४६ व्या जयंती निमित्त प्रतिमा पूजन

 स्वेरीत छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी अभिवादन  करताना अमर जाधव, माजी उपायुक्त, मुंबई पोलीस व मॅनेजिंग डायरेक्टर, इनोवेटिव इन्फोकॉम अँड आय.टी. पार्क्स प्रा.ली. आणि सर्व मान्यवर.
Pandharpur Live - 
पंढरपूर–श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात आज छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या १४६ व्या  जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी स्वेरी अंतर्गत येणाऱ्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पॉलीटेक्निक, पदवी व पदविका फार्मसी या चारही महाविद्यालयांमधील एकूण १० ते १५ व्यक्तींच्या उपस्थितीत व सोशल डिस्टन्सिंग पाळून राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला मुंबईचे माजी पोलीस उपायुक्त व  इनोवेटिव इन्फोकॉम अँड आय.टी. पार्क्स प्रा.ली.चे व्यवस्थापकीय संचालक  अमर जाधव यांच्या हस्ते  पुष्पहार अर्पण करण्यात आला.
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!

           राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमा पूजनानंतर एम.बी. ए. चे विभागप्रमुख प्रा. करण पाटील यांनी शाहू महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकताना म्हणाले की, ‘शाहू महाराजांनी शेतकऱ्यांसाठीच्या विकास कार्यांना गती दिली. बेरोजगारांना रोजगार मिळावा म्हणून विहिरीचे खोदकामे, तलाव, रस्ते, कालवे ही कामे काढली. गरिबांच्या घरी दुष्काळात गरजू साहित्याचे वाटप, अनाथ, अपंग, वृद्ध व निराधार लोकांसाठी अन्नछत्रे देखील काढली. नागरिकांचे जीवन सुरक्षित राहण्यासाठी राजांनी जीवाचे रान करून सर्व प्रकारच्या सोयी सुविधा केल्या. शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली.’असे सांगून प्रा. पाटील यांनी शाहू महाराजांचा जीवनपट उलगडून दाखविला. यावेळी संस्थेचे माजी उपाध्यक्ष आणि संस्थापक सदस्य एन.एस.कागदे, संस्थेचे संस्थापक सचिव व इंजिनिअरींग कॉलेजचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, युवा विश्वस्त सुरज रोंगे, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम. पवार, सर्व अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख  यांच्यासह इतर प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.