सांगोला- कै .वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयाच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका घोरपडे यांचा सत्कार संपन्न


Pandharpur Live-   
नुतन मुख्याध्यापिका अर्चना गोडसे(राऊत ) यांनी स्विकारला पदभार .
सांगोला :-
कै .वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयाच्या  मुख्याध्यापिका  सुवर्णप्रभा  बाळकृष्ण घोरपडे ह्या आपल्या प्रदीर्घ सेवे नंतर दिनांक ३१ मे २०२० रोजी सेवानिवृत्त झाल्या.त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती कौशल्यादेवी शिंदे मॅडम यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 
   Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!
सुरुवातीस संस्थापक कै .वामनराव शिंदे साहेब यांच्या प्रतिमेचे पुजन सत्कारमूर्ती सुवर्णप्रभा घोरपडे मॅडम यांनी केले यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापक  पदाचा  पदभार  अर्चना वसंत गोडसे (राऊत) मॅडम यांनी स्वीकारला.
        संस्था सचिव निळकंठ  शिंदे सर यांनी  शुभेच्छा देताना  प्रशालेच्या केलेल्या एकूण सेवेबद्दल समाधान व्यक्त करून भावी आयुष्याकरिता शुभेच्छा दिल्या. तसेच नूतन मुख्याध्यापिका यांनीही चांगल्या प्रकारे प्रशालेचे कामकाज करून त्यांच्या सेवेकरिता शुभेच्छा दिल्या .यावेळी सत्यप्रीया देशमुख , संतोष कुंभार, विठ्ठलपंत शिंदे, दत्तात्रय पाटील या शिक्षकांनीसुद्धा शुभेच्छा दिल्या.