पुण्यात धक्कादायक घटना... पती-पत्नी आणि दोन्ही मुलांनी गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

Friday, 19 June 2020

पुण्यात धक्कादायक घटना... पती-पत्नी आणि दोन्ही मुलांनी गळफास घेऊन संपवली जीवनयात्राPandharpur Live -
पुण्यात पती, पत्नी व दोन मुलांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची  धक्कादायक घटना घडली आहे.  एकाच कुटुंबातील चार जणांनी गळफास घेतल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

 सुखसागर नगर परिसरातील वाघजाईनगरात राहणाऱ्या अतुल दत्तात्रय शिंदे, पत्नी जया अतुलशिंदे यांच्यासह ऋग्वेद अतुल शिंदे (वय 6 वर्ष), अंतरा अतुल शिंदे (वय 3 वर्ष) अशी मृतांची नावं आहेत. या दाम्पत्यानं आत्महत्या का केली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

परंतु या दाम्पत्याने आत्महत्या करण्यापूर्वी घराच्या भिंतीवर कारण लिहून ठेवल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. 'कृपया पोलिसांनी कोणालाही त्रास देऊ नये. आम्ही आमच्या मर्जीने परिस्थितीला कंटाळून स्वतःला संपवित आहोत' असे घराच्या भिंतीवर लिहिलेले आढळले. त्याखाली पती पत्नीची सही आढळून आली आहे.यातील पतीचा डिजिटल आय कार्ड बनवण्याचा व्यवसाय असल्याचे समजते.

Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!
सामूहिक आत्महत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन त्यांनी शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. अतुल शिंदे यांनी आपल्या पत्नी आणि मुलांसह राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्य संपवलं.

पुण्यात एकाच कुटुंबातील चौघाजणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. काल रात्री ही घटना घडली असून या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. भारती विद्यापीठ   पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा आणि आजूबाजूला चौकशी सुरू केली आहे. 

अतुल दत्तात्रय शिंदे वय ३३ वर्ष, जया अतुल शिंदे वय ३२ वर्ष , ऋग्वेद अतुल शिंदे वय ६ वर्ष आणि अंतरा अतुल शिंदे वय ३ वर्ष अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या चौघांचे मृतदेह घरात लटकलेल्या स्थितीमध्ये आढळून आले. गेल्या दोन दिवसांपासून शिंदे कुटुंबीयांनी घर उघडलं नव्हतं. त्यांचा कुणात वावरही नव्हता आणि काहीही हालचाली दिसून येत नव्हत्या.

शिवाय या कुटुंबातील कुणीही फोन उचलत नव्हते आणि व्हॉट्सअॅपलाही प्रतिसाद देत नव्हते. त्यामुळे संशय आल्याने शेजाऱ्यांनी काल रात्री पोलिसांना फोन करून कळवले. भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शिंदे कुटुंबीयांना बराच वेळ आवाज देऊनही दरवाजा उघडला जात नसल्याने पोलिसांनी दार तोडून आत प्रवेश करताच त्यांना समोरच या चौघांचेही लटकलेले मृतदेह दिसले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पंचनामा केला असून आजूबाजूला चौकशी सुरू केली आहे.

Ad