सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या भारतीय वीर जवांनाना श्रद्धांजली


Pandharpur Live -
सोलापूर:- दिनांक 26 जून 2020
सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी वतीने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली "शहीदो को सलाम" म्हणून सोलापूर शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या हस्ते, जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाटिल, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, गटनेते चेतनभाऊ नरोटे प्रदेश सरचिटणीस अलकाताई राठोड़, यांच्या प्रमुख उपस्थितीत चीन सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांचे प्रतिक असलेल्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन, मेणबत्ती लावून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. भारतीय जवानांवर चीन सैन्याने केलेल्या हल्ल्याचा यावेळी निषेध करण्यात आला.
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!
यावेळी आपले विचार व्यक्त करताना शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांनी म्हणाले की, गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांनी भारतीय जवानावर हल्ला केला. त्यात 20 जवानांची हत्या केली.

 सशस्त्र चिनी सैनिकांबरोबर  लढताना आपले सैनिक निःशस्त्र का होते? भारत सरकारने त्यांना शस्त्र पुरविले नाही का? पंतप्रधान नरेंद्र मोदीनी आपल्या भारतीय हद्दीत कोणीही घूसखोरी केली नाही असे खोटे वक्तव्य करून चीन ला क्लीन चिट दिली. गलवान आणि पँगाँग  खोरे भारतात नाही का? हा भारतात आहेच म्हणून चीनी सैनिकानी घूसखोरी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःची प्रतिमा जपण्यासाठी खोटे बोलत आहेत. 

पंतप्रधान मोदींच्या खोटे बोलण्याचा वापर चीन आणि जागतिक माध्यमानी बेकायदेशीर कब्जाचे समर्थन करण्यासाठी केला आहे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदिनी जनतेसमोर येऊन खरी बाजू मांडली पाहिजे आणि भारतीय जवानांची व जनतेची माफी मागितली पाहिजे

यावेळी सोवापरू म. पा. नगरसेवक शिवा बाटलीवाला, नगरसेवक विनोद भोसले, प्रवीण निकाळजे, नगरसेविका अनुराधा काटकर, माजी महापौर आरिफ शेख, नलिनीताई चंदेले, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, सोलापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, प. म. यंग ब्रिगेड सुदीप चाकोते, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, प्रवक्ते नागनाथ कदम, हसीब नदाफ, ब्लॉक अध्यक्ष अरुण साठे, भटक्या विमुक्त अध्यक्ष भारत जाधव, vjnt युवक अध्यक्ष युवराज जाधव, सुमन जाधव, सिद्धाराम चाकोते, अशोक कलशेट्टी, सायमन गट्टू, राजासाब शेख, ओमकार गायकवाड़, श्रीधर काटकर, अनिल मस्के, अनिल हिबारे, सुभाष वाघमारे, शरद गुमटे, लतीफ मल्लाबादकर, आदि पदाधिकारी उपस्थित होते.