चाकुने सपासप वार करून सोलापूरात एकाची निर्घृण हत्या - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

Friday, 12 June 2020

चाकुने सपासप वार करून सोलापूरात एकाची निर्घृण हत्या


Pandharpur Live -
काका-पुतण्याच्या वादाचे रूपांतर हत्येत
सोलापूर : नई जिंदगी परिसरातील मदिना चौकाजवळ  चाकूने सपासप वार करून एकाची निर्घृण हत्या करण्यात आली.  दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी धाव घेतली.

शकील पटेल असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असल्याचे सांगण्यात आले. काका आणि पुतण्याच्या वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. 
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!
गेल्या अनेक दिवसांपासून काका आणि पुतण्यामध्ये घरगुती कारणावरून वाद सुरु होते. याच कारणावरून  दुपारी बाराच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या तरुणांनी चाकुने वार करून खून केल्याची प्राथमिक माहिती आहे. 

घटनेची माहिती कळताच विजापूर नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस अधिकारी संजय जगताप यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन पुढील प्रक्रियेसाठी पाठविण्यात आला आहे.

घरगुती कारणावरून सुरु असलेल्या वादाबाबत चर्चेतून मार्ग काढला असता तर  ही खूनाची घटना घडली नसती. अशी चर्चा परिसरात ऐकावयास मिळाली.

Ad