विद्यापीठातील क्वारंटाइन केंद्रांची जिल्हाधिकारी, आयुक्तांकडून पाहणी


Pandharpur Live- सोलापूर, दि. 2- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वस्तीगृह येथील क्वारंटाइन सेंटरला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि  सोलापूर महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी आज भेट देऊन पाहणी केली.        

Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!
कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांना व नागरिकांना येथील क्वारंटाइन केंद्रात ठेवण्यात आले आहे.  श्री. शंभरकर आणि श्री शिवशंकर यांनी या केंद्राला भेट देऊन येथील नागरिकांशी चर्चा केली.  त्या नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. भोजनाची दर्जाही तपासली. यावेळी सुरक्षितता आणि स्वच्छतेच्या अनुषंगाने आवश्यक कामकाज करण्याच्या सूचना त्यांनी अधिकार्‍यांना दिल्या.