पडळकरांच्या वक्तव्यावर शरद पवार यांनी दिली 'ही' प्रतिक्रिया

Pandharpur Live Online

SATARA- भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या शैलैत प्रत्युत्तर दिले. ज्यांना विधानसभा, लोकसभेला लोकांनी बाजूला केले आहे, अशा लोकांची नोंद घ्यायची आवश्यकता नाही, अशी उपहासात्मक टीका शरद पवार यांनी पडळकरांचे नाव न घेता केली आहे. शरद पवार सातारा येथे पत्रकारांशी बोलताना ही टीका केली.


शरद पवार म्हणाले, ज्यांना विधानसभा, लोकसभेला लोकांनी बाजूला केले आहे, त्यांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. अशांना वेळोवेळी लोकांनी उत्तर दिले आहे. अशा लोकांची नोंद घ्यायची आवश्यकता नाही. असे शरद पवार यांनी म्हटले आहे. पडळकर यांनी केलेल्या विधानामुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यामुळे खुद्द शरद पवार पडखळकरांना कशा पद्धतीने प्रत्युत्तर देतात याकडे सर्व राज्याचे लक्ष लागून राहिले होते. अखेर शरद पवार यांनी सातारा येथे पत्रकारांशी संवाद साधताना आपल्या शैलीत पडळकर यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.


भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आक्षेपार्ह टीका केली होती. पडळकर यांच्या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात आंदोलन देखील केली होती. आता शरद पवार यांनी स्वतः पडळकर यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया दिली आहे. गोपीचंद पडळकरांना काही महत्व देण्याची गरज नाही, त्यांचे अनेकवेळा डिपॉझिट जप्त झाले आहे, कशाला बोलायचे, असे पवार म्हणाले. ते सातारा दौऱ्यावर असताना बोलत होते. 

Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!

पडळकरांवर पवार म्हणाले की, गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याची नोंद घ्यावी असे त्यांचे काही काम नाही. सांगली लोकसभा निवडणुकीत पराभव व बारामती विधानसभा निवडणुकीत त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. त्यामुळे लोकांनी स्वतःहून त्यांना बाजूला केले असल्याचे दिसून येते. अशा माणसाची कशाला आपण नोंद घ्यावी.


दरम्यान, भाजप आमदार असलेल्या गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांवर खालच्या पातळीवर टीका केली होती. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावर बोलताना त्यांनी शरद पवार हे लागलेले कोरोना असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून पडळकर यांच्याविरोधात गुन्हा देखील दाखल झाला आहे.