पंढरपूर तालुक्यात आणखी एकजण कोरोना पॉझिटीव्ह... आता तालुक्यातील आणखी तिघांच्या रिपोर्ट ची प्रतिक्षा - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

Monday, 1 June 2020

पंढरपूर तालुक्यात आणखी एकजण कोरोना पॉझिटीव्ह... आता तालुक्यातील आणखी तिघांच्या रिपोर्ट ची प्रतिक्षा

Pandharpur Live- पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील रूग्णाच्या संपर्कात आलेल्या बार्डी (ता.पंढरपूर) येथील एका व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.  पंढरपूर शहर आणि तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता एकुण 7 झाली आहे. करकंब येथील 39 व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी 38 व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. पंढरपूर शहरातील आता केवळ तीन व्यक्तींचे रिपोर्ट प्रलंबित आहेत, अशी माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

पंढरपूर शहर आणि तालुक्यातील ऊपरी येथे प्रत्येकी दोन तर तालुक्यातील करकंब आणि गोपाळपुर येथील प्रत्येकी एक अशा सहा जणांचे रिपोर्ट यापूर्वी पॉझिटिव्ह आले होते. पुण्याहून करकंबला आलेल्या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कातील अन्य 39 व्यक्तींचे स्वॉब घेण्यात आले होते.

Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!


Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-

DVP MARTहे सर्व रिपोर्ट प्राप्त झाले असून 39 पैकी 38 लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. पैकी एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आता पंढरपूर शहर आणि तालुक्यातील कोरोना रुग्णांचा आकडा एकूण सात वर पोहोचला आहे. वाखरी येथील एमआयटीमधील कोव्हीड सेंटरमध्ये 59 व्यक्तींना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

Ad