राज्यातील लॉकडाऊन ३१ ऑगस्टपर्यंत वाढवला... दुचाकीवर डबलशिटला परवानगी! जाणुन घ्या, राज्यात काय सुरु काय बंद राहणार


पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-
मुंबई :

राज्यातील लॉकडाऊन ३१ ऑगस्टपर्यंत वाढवला असला तरी राज्य सरकाने अनेक सवलती जाहीर केल्या आहेत.त्यानुसार राज्यात येत्या ५ ऑगस्टपासून मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यंत मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स सुरु करता येणार आहे. मात्र मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्समधील सिनेमागृह, फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट सुरु ठेवण्यास परवानगी दिली नाही.होम डिलिव्हरी करण्यासाठी फूड कोर्ट आणि रेस्टॉरंटला किचन सुरु ठेवता येणार आहे. ज्या खेळांमध्ये संघाची आवश्यकता नाही म्हणजेच मल्लखांब, बॅडमिंटन, टेनिस, जीम गोल्फ अशा खेळांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच यापुढे दिचाकीवरून दोन व्यक्तींना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

................. 

Adv.

धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री. अभिजीत (आबा) पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


...............

राज्यात काय सुरु काय बंद राहणार?

  • ५ ऑगस्टपासून  मॉल आणि मार्केट सुरु होणार
  • मॉल्स, मार्केट कॉम्प्लेक्स पुन्हा सुरु करण्यास परवानगी
  • ज्या खेळांमध्ये संघाची आवश्यकता नसते अशा आऊटडोअर खेळ (मल्लखांब, बॅडमिंटन, टेनिस, जीम) परवानगी
  • मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्समधील थिएटर, फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट बंदच राहणार
  • सध्या सुरु असलेल्या सर्व कंपन्यांना सुरु राहण्यास परवानगी
  • अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकान पूर्वीप्रमाणेच सुरु राहणार
  • टॅक्सी, कॅब,चारचाकी वाहनामध्ये केवळ आवश्यक प्रवासासाठी चालक आणि ३ प्रवाशांना प्रवासाची परवानगी
  • रिक्षा मध्ये पूर्वी प्रमाणेच चालक आणि २ प्रवाशांना प्रवास करता येणार आहे
  • दुचाकीवर चालक आणि एक प्रवासी असा प्रवास करता येईल.
 त्याचबरोबर आऊटडोअर खेळ ज्यामध्ये संघाची गरज नाही असे गोल्फ, फायरिंग रेंज (आऊटडोअर), व्यायामशाळा (आऊटडोअर), टेनिस, बॅडमिंटन (आऊटडोअर) आणि मल्लखांब यांना ५ ऑगस्टपासून परवानगी देण्यात आली आहे. यावेळी फिजिकल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायजेशन अनिवार्य असणार आहे. स्विमिंग पूल सुरु करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. दरम्यान दुचाकीवर दोघांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. टॅक्सी, कॅबमध्ये १ अधिक ३, रिक्षामध्ये १ अधिक २, चारचाकीमध्ये १ अधिक ३ आणि दुचाकीवर दोघांना परवानगी देण्यात आली आहे. पण यावेळी मास्क अनिवार्य असणार आहे.