आणि माझे मन भरून आले... श्रध्दा कपुरने मराठीत पत्र लिहून मानले चाहत्यांचे आभार


Pandharpur Live Online-  आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे श्रद्धा कपूर. श्रद्धा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तसेच तिचा चाहता वर्ग देखील मोठा असल्याचे पाहायला मिळते. नुकताच श्रद्धाने मराठीमध्ये पत्र लिहून चाहत्यांचे आभार मानले आहेत.


श्रद्धाचे काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्राम अकाऊंटवर ५० मिलियन फॉलोअर्स झाले आहेत. त्यामुळे मराठीमध्ये ट्विट करत तिने पोस्ट लिहिली आहे. 'माझे सर्व चाहते, फॅन क्लब आणि हितचिंतक. तुम्ही प्रेमाने बनवलेले व्हिडीओ आणि पोस्टर पाहून माझे मन भारावले. तुमच्या सर्वांमुळे आज मी इथपर्यंत पोहोचले आहे. तुम्हा सर्वांना माझ्याकडून भरभरुन प्रेम.

असेच सुखी रहा आणि आनंदी रहा. तसेच कृपया स्वत:ची काळजी घ्या आणि एकमेकांशी प्रेमाने रहा. धन्यवाद ५० मिलियन वेळा' असे तिने ट्विटमध्ये म्हटले आहे.
मराठीसोबतच तिने हिंदी आणि इंग्रजीमध्ये पत्र लिहित चाहत्यांचे आभार मानले आहेत.
बॉलिवूड अभिनेत्रींच्या इन्स्टाग्रामच्या सर्वाधिक फॉलोअर्स यादीमध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्रा पहिल्या क्रमांकावर आहे. तिचे ५४.७ मिलियन फॉलोअर्स आहेत. त्यानंतर दीपिका पादुकोण दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिचे ५०.३ मिलियन फॉलोअर्स आहेत. आता श्रद्धा कपूरने तिसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकावले आहे. तिचे ५०. १ मिलियन फॉलोअर्स आहेत.