चार राज्यांमध्ये ५० हून अधिक जणांच्या हत्या करणारा डॉक्टर गजाआड!


पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-

राजधानी दिल्लीसह आजूबाजूच्या राज्यात ५० हून अधिक ट्रक तसेच टॅक्सी चालकांच्या हत्यांमागील मुख्य सुत्रधाराला अखेर दिल्ली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दिल्लीतील बपरोला परिसरातून पोलिसांनी या आयुर्वेदिक डॉक्टरला अटक केली आहे. तुरुंगात शिक्षा भोगत असताना संचित रजेवर हा आरोपी बाहेर आला होता, तेव्हापासून तो फरार होता. देवेंद्र शर्मा (वय ६२) असे आरोपीचे नाव आहे.

जानेवारी महिन्यापासून तो दिल्लीत लपून बसला होता. डॉ. शर्मा वर अनेकांच्या हत्यांचा आरोप आहे. पंरतु, त्याने किती हत्या केल्या आहेत, हे सांगता येणे कठीण असल्याची माहिती दिल्ली पोलिसांकडून देण्यात आली आहे.

दिल्ली, उत्तरप्रदेश, हरियाणा तसेच राजस्थान पोलिसांकडून अजूनही आरोपीविरोधात दाखल इतर गुन्ह्यांचा तपास केला जात आहे.

बीएएमएस पदवीधारक शर्मा उत्तर प्रदेशातील अलीगढ जिल्ह्यातील पुरेनी गावचा रहिवासी आहे. हत्या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली होती. तुरुंगात शिक्षा भोगत असताना आरोपी संचित रजेवर बाहेर आला होता. पंरतू, गेल्या सहा महिन्यांपासून तो रजा संपून देखील तुरुंगात परतला नव्हता. दिल्ली गुन्हेशाखेकडून यासंबंधी मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीला अटक​ करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात खोटी गॅस एजेन्सी चालवण्याच्या आरोपखाली आरोपीला यापूर्वी दोन वेळा अटक करण्यात आली आहे. तो किडनी विक्रीची टोळी चालवत होता. या आरोपाखाली देखील शर्माला अटक​ करण्यात आली होती.

गुन्हे शाखेचे उपायुक्त राकेश पवेरिया म्हणाले की, पोलीस कारवाई पूर्वी आरोपी मोहन गार्डन परिसरात राहत होता. यानंतर आरोपी बपरोला येथे गेला. येथे त्याने एका विधवा महिनेशी लग्न केले. या दरम्यान तो प्रॉपर्टीचा व्यवसाईक म्हणून वावरत होता. माहिती मिळताच मंगळवारी पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. आरोपीने बिहारच्या सीवार मधून बीएएमएसची पदवी मिळवल्यानंतर जयपूर येथे ​तो क्लिनिक चालवत होता. १९९२ मध्ये त्याने गॅस डिलरशीप मध्ये ११ लाखांची गुंतवणूक केली मात्र त्याला नुकसान झाले. यानंतर १९९५ मध्ये त्याने अलीगढ येथील छारा गावात खोटी गॅस एजेन्सी सुरु करीत गुन्हेगारी विश्वात पाऊल टाकले होते. आरोपीला लवकरच उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.