स्वेरीज फार्मसीच्या डॉ. मणियार यांनी ‘सायंटिफिक प्रोग्राम’ मधून केले ऑनलाइन मार्गदर्शनपंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरी तथा श्री विठ्ठल एज्युकेशन ॲन्ड रिसर्च इन्स्टीट्युट संचलित कॉलेज ऑफ फार्मसी (बी.फार्मसी) चे रिसर्च अँड डेव्हलपमेंटचे विभागप्रमुख डॉ. मिथुन मणियार यांनी युनायटेड किंगडम (यु.के.) येथे झालेल्या ‘सायंटिफिक प्रोग्राम’ मध्ये ऑनलाइन मार्गदर्शन केले. डॉ. मणियार यांची या कॉन्फरन्ससाठी निवड झाली होती. ते प्रत्यक्षात जाणार होते परंतु कोविड -१९ मुळे ही कॉन्फरन्स ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली.

       ‘नाईंटीन इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन फार्मासुटिकल अँड नॉव्हेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या परिषदमध्ये स्वेरीज कॉलेज ऑफ फार्मसीच्या डॉ.मिथुन मणियार यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. या इंटरनॅशनल कॉन्फरन्ससाठी जवळपास ८ देशातील विविध शास्त्रज्ञ व प्राध्यापकांनी मार्गदर्शन केले. तसेच या कॉन्फरन्ससाठी जवळपास ४० लोकांनी सहभाग नोंदवला होता. या परिषदमध्ये डॉ. मणियार यांनी ‘लेट्रॉझोल लोडेड स्प्रे ड्राईड लिपोझोम  विथ पेनिट्रेशन एन्हान्सर  फॉर टॉपिकल अप्लिकेशन’ या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा विषयावर मार्गदर्शन केले. या कॉन्फरन्स मध्ये मार्गदर्शन करताना लीपोझोम कॅन्सर वरील उपचारासाठी कसे लाभदायक आहे याविषयी मार्गदर्शन केले. 

या संशोधनावर डॉ. मणियार यांचे तीन आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये शोध निबंध प्रसिद्ध झाले आहेत. या मार्गदर्शनामुळे स्वेरीच्या डॉ. मणियार यांचे नाव आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शास्त्रज्ञ व प्राध्यापक यांच्या पंक्तीत कोरले गेले आहे. यापूर्वी स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, संशोधन विभागाच्या वतीने डॉ. प्रशांत पवार, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पॉलीटेक्निक) चे प्राचार्य डॉ. एन.डी.मिसाळ, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात यांच्यासह इतर प्राध्यापकांनी परदेश दौरे करून इतर शास्त्रज्ञ व प्राध्यापकांना मार्गदर्शन केले होते परंतु ऑनलाईन मार्गदर्शन करण्याची बाब डॉ. मणियार यांच्या माध्यमातून प्रथमच पूर्ण झाली. संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी.बी. नाडगौडा, उपाध्यक्ष आर. बी. रिसवडकर, संस्थेचे इतर पदाधिकारी, स्वेरी कॅम्पसचे इनचार्ज प्रा. एम.एम.पवार  व विश्वस्त, प्राचार्य डॉ. अमित गंगवाल तसेच स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांनी डॉ. मणियार यांचे अभिनंदन केले.