पंढरपूर सिंहगड काॅलेज मध्ये 'फॕकल्टी डेव्हेलोपमेंट प्रोग्राम' संपन्न.


Pandharpur Live- 
पंढरपूर (प्रतिनिधी)
 कोर्टी येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, एस्.के.एन् सिंहगड कॉलेज अॉफ इंजिनियरींगच्या स्थापत्य अभियांत्रिकी  (सिव्हिल इंजिनियरींग) विभाग व स्पोकन् टुटोरियल, आय्.आय्.टी.मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने 'क्यू कॕड अँड क्यू जीआय्एस्' या विषयावर पाच दिवसीय 'फॕकल्टी डेव्हेलोपमेंट प्रोग्राम'चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
Adv. आठवणीतील वारी: वेळवी रामवाडी (ता.दापोली, जि.रत्नागिरी) ग्रामस्थांची अविस्मरणीय दिंडी-2019

सिंहगड-पंढरपूर अभियांत्रिकी महाविद्यालयाचेे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या संकल्पनेतून, अभियांत्रिकी क्षेत्रातील प्राध्यापक वर्ग बदलत्या अभियांत्रिकी व तंत्रज्ञान क्षेत्रातील  अभ्यासक्रमात बांधकाम व स्थापत्य विषयक आधुनिकता अवगत करुन घेऊन त्याचा फायदा अभियांत्रिकी अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना  ज्ञानदान करताना  व्हावा हा  मुळ उद्देश  डोळ्यासमोर ठेऊन  या प्रोग्रामचा आयोजन करण्यात आला होता.

 सदर कोव्हिड १९ परिस्थितीत पाच दिवस "ऑनलाईन"माध्यमातून चाललेल्या या कार्यक्रमामध्ये 'क्यू जी आई एस व क्यू कॅड' या सॉफ्टवेअरच्या वापराविषयीचे प्राथमिक माहिती व सखोल मार्गदर्शन  करण्यात आले.

या प्रोग्राम मध्ये दररोज झालेल्या मार्गदर्शन सत्रांवर आधारित असाइंन्मेंटस् सहभागी शिक्षकांकडून अॉनलाईन् पध्दतीने सोडवून घेण्यात आले व त्यास शिक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला अशी माहिती विभागप्रमुख डॉ.चेतन पिसे यांनी दिली.

 सदर कार्यक्रमात भारत, नेपाळ, बांग्लादेश, ओमान, रवांडा व इथिओपिया येथील  शिक्षक सहभागी झाले होते.सहभागी झालेल्या सर्व शिक्षकांकडून, कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून काम पाहिलेल्या प्रा. गणेश लकडे व प्रा. संगमनाथ उप्पीन यांच्या उत्कृष्ठ नियोजनाचे व महाविद्यालयाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. हा प्रोग्राम यशस्वी करण्यासाठी  स्थापत्य अभियांत्रिकी  विभागप्रमुख डॉ. चेतन पिसे,   यांच्यासह विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभले.