पंढरपूर सिंहगड मध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागाचा ऑनलाईन पालक मेळावा

पंढरपूर:- सावित्रीबाईफुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, एस के एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्सअँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी ऑनलाईन पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. हा पालक मेळावा उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

या वेळी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. सुधा सुरवसे यांनी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या पालक मेळावा सहभागी पालकांचे स्वागत केले. यावेळी सहभागी पालकांना प्रा. सुधा सुरवसे यांनी महाविद्यालयाच्या वतीने सोशल मिडिया यु ट्युब चॅनल च्या माध्यमातून मुलांना विषय समजून घेता आले आहेत. विद्यार्थ्यांना कोर्सेरा  कोर्सेस च्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान अवगत करणे भविष्यात सोपे जाईल. पुढच्या आठवड्यामध्ये वेगवेगळ्या विषयांवर ऑनलाइन वेबिनार आयोजित करण्यात आले आहेत. पूढील सत्रामध्ये इटेल्सा, आयईटीई, इनोव्हेशन क्लब च्या माध्यमाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. १३ जुलै रोजी विद्यार्थ्यासाठी  ऑनलाईन काॅन्फरन्स आयोजित केली होती. यामध्ये विद्यार्थी आपले प्रकल्प सादर केले. अशी विविध माहिती विभाग प्रमुख प्रा. सुधा सुरवसे यांनी दिली.

यावेळी उपस्थित पालकांनी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या पालक मेळाव्याचे कौतुक केले. पालकांनी विचारलेल्या प्रश्नांना प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी उत्तरे दिली.
हा मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रा. गणेश बिराजदार सह विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.

फोटो ओळी पंढरपूर सिंहगड मध्ये ऑनलाईन पालक मेळावा प्रसंगी सहभागी पालक व शिक्षक