पंढरपूर सिंहगडच्या विद्युत अभियांत्रिकी मध्ये तीन दिवशीय कार्यशाळा संपन्न


कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींगला महाविद्यालयातील विद्युत अभियांत्रिकी विभागात तीन दिवशीय कार्यशाळा संपन्न झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. 
...............
Adv.
धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री. अभिजीत (आबा) पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्युत अभियांत्रिकी विभागात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दि. २७ जुलै ते २९ जुलै २०२० या कालावधीत मध्ये " अॅडव्हान्स सीपीपी" या विषयावर तीन दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सहभागी विद्यार्थ्यांना तज्ञांकडून विविध विषयांवर महत्वपूर्ण अशी माहिती देण्यात आली. या कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांना अतिशय महत्वपूर्ण मार्गदर्शन केल्यामुळे विद्यार्थ्यांमधुन आनंद व्यक्त होत आहे.
  महाविद्यालयातील विद्युत अभियांत्रिकी विभागाच्या वतीने ही कार्यशाळा विभाग प्रमुख प्रा. श्रीनिवास गंजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या अॅडव्हान्स सीपीपी या कार्यशाळेत
विविध गोष्टीचे शिक्षण देण्यात आले असुन या कार्यशाळेत ५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभागी घेतला होता.
    ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी विद्युत अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रा. सुर्यकांत पाटील, प्रा. दत्तात्रय काळेल, प्रा. श्रद्धा गिड्डे यांनी परिश्रम घेतले.