सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात कलम 37 (1), (3) लागू... जिल्ह्यात उपाययोजनांचा भंग करणाऱ्यांकडून सुमारे 79 लाख रुपयाचा दंड वसूल




सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात  कलम 37 (1), (3) लागू

सोलापूर दि.21 :-सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात (पोलीसआयुक्तालय हद्द वगळूनसर्वत्र  शांतताकायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून 2 ऑगस्ट 2020 पर्यत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1) आणि 37 (3) आदेश अपर जिल्हादंडाधिकारी अजित देशमुख यांनी जारी केले आहेत.

 या आदेशानुसार शस्त्रेझेंडा लावलेली काठी किंवा शरीरास ईजा करण्याकरीता वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणेकोणताही ज्वालाग्राही अगर स्फोटक पदार्थ वाहून नेणेव्यक्ती अगर त्यांची प्रेत यात्राप्रतिमा यांचे प्रदर्शन करणेसार्वजनिक घोषणा करणेअसभ्य हावभाव करणेग्राम्य भाषा वापरणेसभ्यता अगर निती  विरुध्द निरनिराळया जाती जमातीच्या भावना दुखावल्या जातीलत्यामुळे त्यांच्यात भांडणे बखेडे निर्माण होवून शांततेस बाधा होईलसोंगे अगर चिन्हे कोणताही जिन्नस तयार करुन त्याचा प्रसार करण्यास मनाई करण्यात येत आहे.

हा आदेश अत्यावश्यक सेवातसेच सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये अधिकार बजाविताना उपरनिर्दीष्ठ वस्तू हाताळाव्या लागतात आणि ज्या व्यक्तींना जिल्हादंडाधिकारी, पोलीस अधिक्षक (ग्रा.)उपविभागीय दंडाधिकारीउपविभागीय पोलीस अधिकारीपोलीस निरीक्षकदुय्यम पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या परवानगीस लागू होणार  नाहीत.

00000

जिल्ह्यात उपाययोजनांचा भंग करणाऱ्यांकडून

सुमारे  79 लाख रुपयाचा दंड वसूल

          सोलापूर, दि.21: कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा भंग करणाऱ्यांकडून जिल्ह्यात सुमारे  79 लाख 70 हजार 80 रुपयाचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. यामध्ये सर्वात जास्त मास्क न वापरणाऱ्यांकडून वसूल करण्यात आले आहेत, यामुळे प्रत्येक नागरिकांनी मास्क वापरण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.

          जिल्हा पोलीस अधीक्षक, तहसीलदार कार्यालय आणि नगरपालिका प्रशासनाकडून याबाबतची कारवाई करण्यात आली. 6 ते 21 जुलै 2020 दरम्यान ही कारवाई करण्यात आली. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे, दुचाकी वरुन दोघांनी प्रवास करणे, तीन, चार चाकी वाहनातून मर्यादेपेक्षा जास्त व्यक्तींचा प्रवास,  निर्धारित वेळेनंतर दुकाने सुरु ठेवणे, सोशल डिस्टन्सींग न पाळणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखुचे सेवन करणे याबद्दल ही कायदेशीर कारवाई केली आहे. यामध्ये पोलीस अधीक्षकांनी 37289 प्रकरणात 60 लाख 37  हजार 600 रुपयांचा दंड वसूल केला. सर्व तहसीलदार कार्यालयाने 10136 प्रकरणात 14 लाख 86 हजार 800 रुपयाचा तर सर्व नगरपालिका प्रशासनाकडून 3293 प्रकरणात 4 लाख 45 हजार 680 रुपयांचा दंड वसूल केला.

            दरम्यान, आज शहरात ठिकठिकाणी विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्त कार्यालाकडून वाहने तपासणी सुरु होती.