जिल्ह्यात 136 टक्के खरिपाची पेरणी सर्वाधिक करमाळा तालुक्यात 296 टक्के पेरणी

            सोलापूर,दि.18: यंदा जिल्ह्यात ऊस पीक वगळता 136 टक्के खरिपाची पेरणी झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी दिली. सर्वाधिक 296 टक्के पेरणी ही करमाळा तालुक्यात झाली आहे.


           सोलापूर जिल्हा रब्बी जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्हा प्रशासनाच्या पाठपुराव्यामुळे आता खरिपाचा जिल्हा म्हणून मान्यता मिळाली आहे. यामुळे खरिपाच्या पेरणीमध्येही वाढ झाल्याचे दिसून येते. उसासहित खरिपाची पेरणी 90 टक्के झाली आहे. उत्तर सोलापूर तालुक्यात ऊस क्षेत्र वगळून सरासरी 4162 हेक्टर क्षेत्र पेरणीयोग्य आहेमात्र याठिकाणी 6498 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून याची टक्केवारी 156 इतकी आहे. यंदा जिल्ह्यात उसाचे सरासरी क्षेत्र 1 लाख 37 हजार 536 हेक्टर असून यापैकी 18 हजार 102 हेक्टरवर लागवड झाली आहे.    


          दक्षिण तालुक्यात 21 हजार 168 सरासरी क्षेत्र (पेरणी-32 हजार 655 हेक्टर154 टक्के)बार्शी- 57 हजार 389 सरासरी क्षेत्र (पेरणी-68 हजार 937 हेक्टर120 टक्के)अक्कलकोट- 65 हजार 225 हेक्टर (पेरणी-69 हजार 443 हेक्टर106 टक्के)मोहोळ-4780 हेक्टर (पेरणी-9623 हेक्टर201 टक्के)माढा-17 हजार 460 हेक्टर (पेरणी- 30 हजार 321 हेक्टर174 टक्के)करमाळा-14 हजार 49 हेक्टर (पेरणी-41 हजार 562 हेक्टर296 टक्के)पंढरपूर-2328 हेक्टर (पेरणी-2002 हेक्टर86 टक्के)सांगोला-17 हजार 721 हेक्टर (पेरणी-28 हजार 713 हेक्टर162 टक्के)माळशिरस-11 हजार 217 हेक्टर (पेरणी-8733 हेक्टर78 टक्के) आणि मंगळवेढा- 19 हजार 142 हेक्टर (पेरणी-20 हजार 155 हेक्टर105 टक्के).

पीकनिहाय पेरणी खालीलप्रमाणे.


अ.क्र.

पिकाचे नाव

सरासरी क्षेत्र हेक्टर

पेरणी क्षेत्र हेक्टर

टक्केवारी

1.

भात

149

89

60

2.

खरीप ज्वारी

36

31

86

3.

बाजरी

33351

38825

116

4.

मका

26855

37038

138

5.

रागी

430

19

4

6.

इतर तृणधान्य

1845

130

7

7.

एकूण तृणधान्य

62666

76132

121

8.

तूर

68013

90167

133

9.

मूग

13650

24433

179

10.

उडीद

36064

50940

141

11.

इतर कडधान्य

4369

1351

31

12.

एकूण कडधान्य

122096

166891

137

13.

एकूण अन्नधान्य

184762

243023

132

14.

भुईमूग

3376

6292

186

15.

तीळ

245

155

63

16.

सूर्यफुल

6930

11251

162

17.

सोयाबीन

37811

56977

151

18.

कारळे

154

144

94

19.

इतर गळितधान्य

761

76

10

20.

एकूण गळितधान्य

49277

74895

152

21.

कापूस

602

724

120

22.

एकूण खरीप क्षेत्र (ऊस वगळून)

234641

318642

136

23

ऊस नवीन लागवड

137536

18102

13

24.

एकूण खरीप क्षेत्र उसासहित

372177

336744

90

 

           एकंदरीत एकूण अन्नधान्याचे क्षेत्र सरासरी 1 लाख 84 हजार 762 हेक्टर असून 2 लाख 43 हजार 23 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गळिताचे सरासरी क्षेत्र 49 हजार 277 हेक्टर असून 74 हजार 895 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ऊस क्षेत्र वगळून खरिपाचे क्षेत्र सरासरी 2 लाख 34 हजार 641 हेक्टर असून 3 लाख 18 हजार 642 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाल्याचे श्री. बिराजदार यांनी सांगितले.