प्रधान सचिव रेड्डी यांची पालकसचिवपदी नियुक्ती कायम


          सोलापूर,दि.23: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे आणि त्याअनुषंगाने वेळोवेळी आढावा घेण्यासाठी उद्योग विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी यांची सोलापूरच्या पालकसचिवपदी नियुक्ती कायम करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबतचा आदेश 28 फेब्रुवारीच्या परिपत्रकानुसार 15 जुलै 2020 रोजी सामान्य प्रशासन विभागाने काढला आहे.

          शासनाने सोलापूर जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा आढावा घेण्यासाठी पालकसचिव म्हणून अतुल पाटणे यांची तात्पुरती नियुक्ती केली होती. ही नियुक्ती संपुष्टात आणून श्री. रेड्डी यांची पालकसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.