सोलापूरमध्ये हृदयद्रावक घटना... पत्नी आणि दोन लेकरांचा खुन करून त्यानं संपवलं आयुष्य! खाजगी सावकाराच्या जाचामुळे एका कुटुंबाचा मन हेलावणारा करूण अंतसोलापूर-
सोलापूर शहरातील पुणे नाका भागात राहणाऱ्या एका कुटुंबातील चौघा जणांचा जीव हेलावुन सोडणारा करूण अंत झालाय. पत्नी, आणि दोन लेकरांचा खुन करून एकाने फाशी घेत स्वतःसह कुटुंबातील सर्वांचा जीवनप्रवास संपुष्टात आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खाजगी सावकाराच्या तगाद्यामुळे एका हसत्या खेळत्या परिवाराचा अंत झाल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे नाका परिसरातील हंडे प्लॉट भागात अमोल जगताप (वय 35) याने, स्वतःची पत्नी मयुरी जगताप (वय 28), मुलगा आदित्य (वय 7) व मुलगी आयुषी (वय चार वर्षे) या चौघांचा खुन केला आणि यानंतर स्वतः आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना सोमवारी सायंकाळी घडली.

कर्जबाजारी झाल्याने पत्नी व दोन मुलांची हत्या करून मी स्वतः आत्महत्या करत आहे. असा मजकूर असल्याची चिठ्ठी घरात आढळून आली असुन अधिक तपास सुरू आहे अशी माहिती पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिली आहे.

या चौघांचे मृतदेह त्यांच्या घरात आढळले आहेत.  वडील व दोन्ही मुलं फाशी घेतलेल्या अवस्थेत तर पत्नी पलंगावर मृतावस्थेत पडल्याचे दिसुन आले.  घटनास्थळी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी भेट दिली. अमोल जगताप हॉटेल व्यावसायिक होते. पोलिसांनी चौघा जणांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.