माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती पदी सागर पाटील यांची पश्चिम महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष पदी निवड


   सातारा:   केंद्रीय निवडणूक आयोग मान्यता प्राप्त नॅशनल स्पेशालिस्ट पार्टी संलग्न असलेल्या माहिती आधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सागर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

हि निवड माहिती आधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री मा अभिजित आपटे राष्ट्रीय महासचिव गोविंद भावे समस्त विभागाचे मार्गदर्शक मा मनोज काळसेकर व मा प्रकाश भारती  यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष मा दिलीप कांबळे यांच्या संमतीने उपाध्यक्ष कमलेश शेवाळे यांनी निवडीसंबंधीचे पत्र दिले.

 पाटील यांनी पत्रकार क्षेत्रांमध्ये आजपर्यंत केलेले कामाची दखल घेऊन त्यांची  माहीती अधिकार व पत्रकार संरक्षण  उपाध्यक्ष पदी त्यांची निवड करण्यात आली.पाटील यांची पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व आभार व्यक्त केले जात आहे  पाटील यांच्या निवडीबद्दल सातारा येथील सामाजिक राजकीय संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना पाटील म्हणाले की पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून आज  दिवसेंदिवस  पत्रकारांवर होणारे गुन्हे व होणारे अत्याचार व खोट्या गुन्ह्यात प्रकार ओवले जाते त्याची कुठलीही शहानिशा न करता त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जातो. 

आज लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारावर दररोज जीवघेणे हल्ले होत आहेत तर याला पायबंद घालण्यासाठी माहीती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती च्या वतीने पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रमाणीक प्रयत्न केला जाईल यासाठी पत्रकारांनी  कशालाही  न घाबरता माहीती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती  मध्ये  मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आव्हानही त्यांनी केले.