दत्ताजीराव पाटील आणि अविनाश साळुखे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर येथील पत्रकार अविनाश साळुंखे यांना पत्रकारितेतील आदर्श पत्रकार तर दत्त प्रिंटर्सचे संचालक दत्ताजीराव पाटील यांना मुद्रण व्यवसायात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल, राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने हे पुरस्कार, ह.भ.प. रामदास महाराज जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. याप्रसंगी पंढरपूर पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष रामचंद्र सरवदे , कार्याध्यक्ष राधेश बाधले पाटील आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य सुरक्षा समितीच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणार्‍या राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये, पंढरपूरचे पत्रकार अविनाश साळुंखे यांची निवड करण्यात आली. यंदाचा आदर्श पत्रकार पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे. पंढरपूर येथील मुद्रक व्यावसायिक दत्त प्रिंटर्सचे संचालक दत्ताजीराव पाटील यांना, आदर्श मुद्रक म्हणून राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...............

Adv.
धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री. अभिजीत (आबा) पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

पंढरपूर येथील श्रीसंत कैकाडी महाराज मठामध्ये झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात हे पुरस्कार संबंधितांना प्रदान करण्यात आले. ह.भ.प. रामदास महाराज जाधव यांच्या शुभहस्ते सन्मानपत्र आणि प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले. तीन महिन्यापूर्वी हे पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. राज्यात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सोलापूर येथे 15 मार्च रोजी होणारा, पुरस्कार वितरण सोहळा रद्द करण्यात आला होता. सबंध राज्यातील पुरस्कारप्राप्त मान्यवरांना हे पुरस्कार त्या- त्या ठिकाणी छोटेखानी कार्यक्रम घेऊन प्रदान करण्यात आले.


पंढरपूर तालुक्यातील पत्रकारितेत दैनिक ऐक्य, सुराज्य,  एकमत, जनप्रवास आणि सध्या दामाजी एक्सप्रेस इत्यादी दैनिकातून, आपल्या लेखणीचा ठसा उमटविणारे ,अविनाश साळुंखे हे पंढरपूर तालुक्यातील भोसे गावचे सुपुत्र आहेत. आपल्या धडाकेबाज लेखणीतून त्यांनी अनेक ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले आहे. ते सध्या दै. दामाजी एक्सप्रेस या दैनिकाच्या पंढरपूर विभागाचे विभागप्रमुख पदाची जबाबदारी संभाळत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत, यंदाचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार, महाराष्ट्र राज्य पत्रकार सुरक्षा समितीकडून त्यांना प्रदान करण्यात आला आहे.

पंढरपूर तालुक्यात आपल्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवून काळानुरूप बदल करीत, दत्त प्रिंटर्स या फर्मचे नाव अनेक वर्षापासून प्रिंटिंग व्यवसायात अबाधित आहे. कुशल आणि उत्तम व्यवसायिक दत्ताजीराव पाटील यांच्या अफाट कार्यशक्तीमुळेच हे शक्य झाले आहे. आपल्या व्यवसायात बदलांना स्वीकारत हा व्यवसाय प्रगतीपथावर नेण्याचे काम श्री.पाटील यांनी केले आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव महाराष्ट्र राज्य पत्रकार सुरक्षा समिती कडून पुरस्कार देऊन करण्यात आला आहे. राज्याची अध्यात्मिक राजधानी पंढरीतील, ज्येष्ठ संत ह.भ.प. रामदास महाराज जाधव (कैकाडी) यांच्या शुभहस्ते या दोन्ही मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास पत्रकार अपराजित सर्वगोड, यशवंत कुंभार, विजय कांबळे, राजेंद्र काळे, बाहुबली जैन, सुदर्शन खंडारे, रवी शेवडे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.