क.भा.पाटील स्वायत्त महाविद्यालयात विद्यापीठ वर्धापन दिन संपन्नपंढरपूर -  रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 16 वा वर्धापन दिन ध्वजारोहणाने संपन्न झाला. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. निंबराज तंटक यांच्या हस्ते विद्यापीठ ध्वजाचे रोहन करण्यात आले. ...............

Adv.
धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री. अभिजीत (आबा) पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

यावेळी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. अशोक भोईटे, अधिष्ठाता डॉ. तानाजी लोखंडे, अधिष्ठाता डॉ. सुखदेव शिंदे, इतिहास विभाग प्रमुख डॉ. हनुमंत लोंढे, रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रघुनाथ झांबरे, मराठी विभाग प्रमुख डॉ. राजाराम राठोड, प्रसिद्धीप्रमुख डॉ. दत्ता डांगे, प्रा. विठ्ठल फुले, कार्यालय प्रमुख अनंत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
             या कार्यक्रमानंतर महाविद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमर कांबळे यांनी केले. 
पंढरपूर