जिवा-सेना संघटनेच्या नुतन पदाधिकार्‍यांची निवड; सोलापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी समाधान हिलाल तर पंढरपूर तालुकाध्यक्षपदी राज वाघमारे

 
पंढरपूर (प्रतिनिधी) :-  जिवा-सेना संघटनेच्या नुतन पदाधिकार्‍यांची निवड नुकतीच करण्यात आली. संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष कमलाकार (माऊली) चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर सोशल डिस्टन्स राखुन व आवश्यक ती खबरदारी घेवुन निवडीचा हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सोलापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी समाधान हिलाल कोर्टी,ता.पंढरपूर) पंढरपूर तालुका कार्याध्यक्षपदी दत्तात्रय भुसे (कासेेगाव, ता.पंढरपूर) , पंढरपूर तालुका अध्यक्षपदी राज वाघमारे (भाळवणी, ता.पंढरपूर), तालुका उपाध्यक्ष पांडुरंग शिंदे (तारापूर, ता.पंढरपूर), पंढरपूर शहर उपसचिवपदी राहुल क्षिरसागर (पंढरपूर), पंढरपूर शहर उपकार्याध्यक्षपदी किरण हिलाल (पंढरपूर), पंढरपूर तालुका संपर्क प्रमुखपदी गणेश शिंदे (तारापूर), पंढरपूर शहर संपर्क प्रमुखपदी शुभम भोसले (पंढरपूर) आदी नुतन पदाधिकार्‍यांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी सोलापूर जिल्हाध्यक्ष कमलाकार (माऊली) चव्हाण यांनी सर्वांना निवडीचे पत्र दिले. यावेळी सर्व नुतन पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सोलापूर जिल्हाध्यक्ष कमलाकर (माऊली) चव्हाण, पंढरपूर शहर कार्याध्यक्ष सुनील खंडागळे, शहराध्यक्ष बाळासाहेब काळे, पंढरपूर शहर उपाध्यक्ष संदीप गोरे, पंढरपूर शहर सचिव महेश गोरे, ऋतुराज जाधव (वेळापूर) आदी उपस्थित होते.  

 संस्थापक अध्यक्ष नंदकुमार खरे यांच्या मार्गदर्शनाखाली जीवा सेना संघटना ही नाभिक समाजाच्या सर्वांगीन विकासासाठी संपुर्ण महाराष्ट्रात कार्य करत आहे. नाभिक समाज हा न्याय्य हक्कापासुन, विकासापासुन आणि ऐक्यापासुन कोसो दुर आहे. आपल्या कार्यातुन समाजाच्या शेवटच्या घटकाला सुधारण्यासाठी लक्ष केंद्रीत करुन संघटनेच्या ध्येय धोरणानुसार कार्य करु. असे मत यावेळी नुतन पदाधिकार्‍यांनी व्यक्त केले.

जिवा सेना संघटनेच्या वतीने कन्यादान योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत नाभिक समाजातील आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेल्या गरजु व हुशार मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाते. याद्वारे गरजु व हुशार मुलींच्या शिक्षणासाठी 10 हजार रुपयांची मदत केली जाते. आजतागायत समाजातील  40 गरजु व हुशार मुलींना अशाप्रकारची मदत संघटनेने केलेली आहे. अशा प्रकारे आर्थिक मदत करणारी जिवा सेना ही महाराष्ट्रातील नाभिक समाजाची एकमेव पहिली संघटना आहे. जिवा सेना संघटना ही नाभिक समाजाच्या उत्कर्षासाठी अहोरात्र झटणारी व नि:स्वार्थी आणि राजकारण विरहित सामाजिक कार्य करणारी संघटना आहे. ‘‘ना सत्तेसाठी... ना संपत्तीसाठी... ना राजकारणासाठी... ना पदासाठी... ना नावासाठी... जिवा सेना लढते फक्त नाभिक समाजाच्या उत्कर्षासाठी! जेथे जेथे नाभिक समाज  बांधवांवर अन्याय होत असेल, जेथे जेथे समाजातील कोणी अडचणीत असेल तेथे तेथे त्यांच्या मदतीसाठी जिवा सेना संघटना धावुन जाईल.’’ असे मत यावेळी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष कमलाकार (माऊली) चव्हाण यांनी व्यक्त केले.

जिवा-सेना संघटनेच्या माध्यमातुन आम्ही नाभिक समाजातील तरुणांना एकत्रीत आणुन एक मजबुत संघटन निर्माण केले आहे. संपुर्ण सोलापूर जिल्ह्यात संघटनेचे जाळे निर्माण करत आहोत. त्यानुसार आज कांही नुतन पदाधिकार्‍यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातील नाभिक समाजाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी नुतन पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्न करतील अशी अपेक्षाही यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकार (माऊली) चव्हाण यांनी व्यक्त केली.

Post a comment

0 Comments