लोकाभिमुख कामे करण्यावर भर द्यावा! महसूल दिनी जिल्हाधिकारी शंभरकर यांचे आवाहन


            सोलापूर,दि.1: महसूल अधिकारी प्रशासनाचा कणा असून शासन आणि जनता यांच्यातील महत्वाचा दुवा आहे. महसूल विभाग शेती आणि शेतीशी संबंधित घटकांसोबत इतर महत्वाची कामे करीत असतो. यामुळे शेतकऱ्यांच्या समस्येचे निराकरण वेळेत होऊन लोकाभिमुख कामे करण्यावर या विभागाने भर द्यावाअसे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज केले.

...............
Adv.
धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री. अभिजीत (आबा) पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


  जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री. शंभरकर बोलत होते. यावेळी पोलीस उपायुक्त बापू बांगरप्रशिक्षणार्थी प्रशासकीय अधिकारी अंकितसामाजिक कार्यकर्ते डॉ. शिवरत्न शेटेउपजिल्हाधिकारी स्नेहल भोसलेचिटणीस श्रीकांत पाटीलदक्षिण सोलापूरचे तहसीलदार अमोल कुंभारमहसूल संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंतनू गायकवाडजिल्हाध्यक्ष जयंत जुगदारमहसूल कर्मचारी संघटनेचे विभागीय सरचिटणीस प्रवीण शिरसीकरतलाठी संघटनेचे सरचिटणीस विजय विजापुरेमहसूल चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत भांडेकरकोतवाल संघटनेचे विठ्ठल गुरवपोलीस संघटनेचे अध्यक्ष दिलीप पाटील आदी उपस्थित होते.

            श्री. शंभरकर म्हणाले, ‘सध्या जिल्ह्यात कोविड-19 चा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जागृत राहून कोरोनाबाबत प्रबोधन करून गैरसमज दूर करावा. महसूल विभागातर्फे कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. कर्मचाऱ्यांच्या गृहनिर्माण संस्थेसाठी जागा देण्यास प्राधान्य राहील’.

            महाभूमी पोर्टलवर संगणकीकृत अभिलेखापैकी फक्त सातबारा उतारा डिजीटल स्वाक्षरीने जनतेला डाऊनलोडसाठी उपलब्ध होता. आता डिजीटल स्वाक्षरीत खाते उताराही मिळणार आहे. कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी, पीक कर्ज किंवा जमीन खरेदी विक्रीसाठी सातबारा उताऱ्यासोबत खाते उतारा आवश्यक आहे. यामुळे महसूल विभागाने खाते उतारासुद्धा तलाठी यांच्या डिजीटल स्वाक्षरीने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहेआजपासून ही सेवा उपलब्ध असणार आहेयाचा जनतेने लाभ घेण्याचे आवाहन श्री. शंभरकर यांनी केले.


            प्रास्ताविक जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील यांनी केले. सूत्रसंचालन निवृत्त तहसीलदार नागनाथ माळवदकर यांनी केले तर आभार संदीप लटके यांनी मानले.