राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी संदीप मांडवे यांची निवड करा! आमदार भारतनाना भालके यांचेकडे युवा कार्यकर्त्यांची मागणी
पंढरपूर (प्रतिनिधी):- राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील धडाडीचे कार्यकर्ते, राष्ट्रवादी युवक चे विद्यमान शहराध्यक्ष संदीप मांडवे यांची निवड करावी. अशी मागणी  आमदार भारतनाना भालके यांचेकडे आज पंढरीतील अनेक युवा कार्यकर्त्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकार्‍यांच्या फेरनिवडी करण्यात येणार आहेत. या पार्श्‍वभुमीवर पंढरीतील राष्ट्रवादीच्या अनेक युवा कार्यकर्त्यांनी ही मागणी केली.
...............
Adv.
धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री. अभिजीत (आबा) पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

संदीप मांडवे  हे राष्ट्रवादीचे व आमदार भारतनाना भालके यांचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. सन 2015 पासुन ते राष्ट्रवादी युवक चे पंढरपूर शहराध्यक्ष म्हणुन कार्यरत आहेत. या कालावधीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी व पक्षाची ध्येय धोरणं तळागाळातील सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी अविरत प्रयत्न केले. विविध आंदोलनाच्या माध्यमातुन ते  आक्रमकपणे सहभागी झाल्याचे आढळुन आले आहे. जिल्ह्याच्या राजकारणात, समाजकारणात सातत्याने त्यांचा सहभाग असल्याचे ठळकपणे दिसुन आले. संदीप मांडवे यांच्या आजपर्यंतच्या कार्याचा विचार करता सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवकच्या जिल्हाध्यक्षपदी त्यांच्यासारख्या धडाडीच्या एकनिष्ठ आणि सक्रीय कार्यकर्त्याची निवड होणे अत्यावश्यक आहे. असे मत यावेळी अनेक युवा कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

सर्वसामान्य युवकांची एक मजबुत फळी सध्या राष्ट्रवादी युवकचे विद्यमान शहराध्यक्ष संदीप मांडवे यांनी उभी केलेली आहे. अनेक युवकांच्या हाताला काम देण्यासोबतच विद्यार्थ्यांचे प्रश्‍न, गोरगरीबांचे प्रश्‍न, शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी त्यांनी आजपर्यंत सक्रीय भुमिका निभावली आहे. आपल्या कारकिर्दीत त्यांनी सर्वसामान्यांच्या विविध प्रश्‍नांना वाचा फोडण्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणाला जपण्यासाठी विविध आंदोलने, विविध सामाजिक उपक्रम राबविलेले आहेत. याचबरोबर विविध निवडणुकांच्या काळात मोठया संख्येने युवा कार्यकर्त्यांना सोबत घेवुन राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार, विकासात्मक दृष्टीकोन मतदारांसमोर पोहचविण्यासाठी त्यांनी केलेले कार्य निश्‍चितच उठावदार ठरलेले आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी युवकच्या जिल्हाध्यक्षपदी संदीप मांडवे हेच योग्य व्यक्तीमत्व आणि राष्ट्रवादी युवकचा पारदर्शी, स्वच्छ  आणि युवकांमधील लोकप्रिय चेहरा आहे. त्यामुळे त्यांची निवड सोलापूर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी करावी. अशी विनंती यावेळी सर्व युवा कार्यकर्त्यांनी आमदार भारतनाना भालके यांची समक्ष भेट घेवुन  केली.   

यावेळी आमदार भारतनाना भालके यांनी या मागणीचा विचार करुन माझ्याकडून आपली मागणी वरिष्ठापर्यंत पोहचवु आणि यासाठी योग्य ते प्रयत्न करु असे आश्‍वासन दिले.