सोलापूर जिल्ह्यासाठी रविवार दिलासादायक... कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या घटली तर रूग्णालयातून बरे होऊन आपापल्या घरी सुखरूप परत गेलेल्यांची संख्या वाढली! बघा आजचे कोरोना रिपोर्ट


सोलापुर जिल्ह्यातील आज कोरोना बाधितांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे.
ही बाब निश्चितच दिलासादायक असल्याने आजचा रविवार जिल्ह्यासाठी दिलासादायक ठरलाय असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही.  बघा आजचे कोरोना रिपोर्ट.

    आज पूर्ण जिल्ह्यात     
 1875 अहवाल आले. यात 185 पॉझिटिव्ह तर     5 जण मृत आहेत. मात्र  आज एकूण 224 जण कोरोना मुक्त झाले आहेत.

सोलापूर ग्रामीण मध्ये आज 1206 अहवाल आले यात 1075 निगेटिव्ह .
 *131 पॉझिटिव्ह* 
4 मृत तर 94 जण कोरोना मुक्त झाले आहेत.

 सोलापूर शहरात आज 669 अहवाल आले .यात 615 निगेटिव्ह आहेत.     
*54 पॉझिटिव्ह* अहवाल असून 1 मृत आहे. 130 जण आज शहरात कोरोना मुक्त झाले आहेत.

 शहर आणि ग्रामीण एकूण कोरोना स्थिती...
 *पॉझिटिव्ह* 
ग्रामीण 3943
 शहर 5104 
एकूण 9047 
 *मृत्यू* 
ग्रामीण 112 
शहरी 365 
एकूण 477 
*उपचार सुरू* 
 ग्रामीण 1583 
शहर     1448 
एकूण    3031 
*बरे झाले* 
 ग्रामीण 2248 
शहर      3191
एकूण    5439