धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत (आबा) पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम संपन्न... रक्तदान शिबीर, वृक्षारोपन, सॅनटायझर/मास्क/आर्सेनिक गोळ्या/खाऊ वाटपासोबतच कोविड योद्ध्यांना दिले सन्मानपत्र आणि भेटवस्तु!
धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत (आबा) पाटील यांचा 37 वा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाद्वारे साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त पंढरपूर तालुक्यातील 40 गावामधील ग्रामपंचायत शिपाई, व आरोग्य सेविका, आशाताई, अंगणवाडी सेविका, यांचा कोविड योध्दा सन्मान करण्यात आला.
‘‘कोरोनाच्या संकटकाळात तुमचं काम म्हणजे ईश्वर सेवेसारखे आहे. कोरोनाच्या काळात आपण स्वतःच्या जिवाची पर्वा न करता लोकांना आधार देऊन कोरोनाशी दोन हात करण्यासाठी बळ देत आहात.’’ अशा शब्दात या कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला.

अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इतर अनावश्यक खर्चाला फाटा देऊन पंढरपूर तालुक्यातील अनेक गावात घेतलेले रक्तदान शिबीर, वृक्षारोपन असे स्तुत्य उपक्रम राबविण्यात आले. याचबरोबर विविध ठिकाणी सॅनटायझर/मास्क/आर्सेनिक गोळ्या/खाऊ वाटपाचे कार्यक्रम व विशेषत: कोविड योद्ध्यांना दिलेले सन्मानपत्र आणि भेटवस्तु! या उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने अभिजीत आबा पाटील मित्र परिवारांनी वाढदिवसानिमित्त देगाव (ता.पंढरपूर) येथे रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. याचबरोबर विविध ठिकाणी 450 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबीरांचं आयोजन आणखी कांही दिवस विविध गावांमधुन करण्यात येणार आहे. अशी माहिती कार्यकारी संचालक अमर पाटील यांनी दिली.

वाढदिवसानिमित्त पंढरपूर तालुक्यातील वाखरी, देगाव, सुस्ते, उपरी, अजनसोंड,मगरवाडी,रोपळे, पटवर्धन कुरोली, पिराची कुरोली, चिंचणी, खेडभाळवणी, पळशी, नांदोरे, आव्हे यासह 40 गावामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. सॅनिटायझर वाटप, मास्क वाटप, खाऊ वाटप या उपक्रमाचे आयोजन मातोश्री वृध्दाश्रम, पालवी, पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन, अनाथ आश्रम अशा विविध ठिकाणी करण्यात आले होते.
 
कोरोनाच्या संकटकाळात नागरिकांना रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी विविध गावात आरसेनीक अल्बम च्या गोळ्याणचे वाटपही करण्यात आले. कोरोना च्या काळात ज्या आशावर्कर , आरोग्य कर्मचारी ,ग्रामपंचायत कर्मचारी यांनी निभावलेल्या महत्वपुर्ण सेवेबद्दल त्यांना भेटवस्तू देऊन ‘कोविडयोद्धा’ म्हणून सन्मानित करण्यात आले. सर्व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डिव्हीपी उद्योग समूहाचे सर्व पदाधिकारी व मित्र परिवाराने परिश्रम घेतले.