भरणी श्राद्ध म्हणजे काय?अथ भरणीश्राद्धम
नमस्कार आज आपन बघू भरणी श्राद्ध म्हणजे काय हे आपण बघू. श्राद्ध म्हणजे पितर यांना संतुष्ट करण्यासाठी जो विधी करतात त्या विधीस श्राद्ध असे म्हणतात. 

भरणी श्राद्ध म्हणजे मृत्यू झालेल्या मनुष्याचा 
( प्रेतत्वमुक्तिसाठी ) जो विधी वंशज करतात त्यास भरणी श्राद्ध म्हणतात. हे या वचनावरून सिद्ध होते. 

भरण्यामकृतं यस्य श्राद्धं चापरपाक्षिकम्।  प्रेतत्वात्रैय मुक्तिस्याद्दत्तै: श्राध्दशतैरपि।। 
तथाच :-
प्रथमाब्दमध्ये भाद्रपदापरपक्षे क्रियांगं भरणीश्राद्धं त्रिदैवत्यं सपिंडकं कार्य।। 

प्रतिवर्षी दर वर्षी भरणी श्राद्ध करावे काय? 
युगादिषु मधायंच विषुवेत्वयने तथा। भरण्यांच प्रकर्तव्य पिंडं निर्वपणं न हि।। 
या वरील वचनानुसार ज्यांना गया या ठिकाणी श्राद्ध केल्याचे फल पाहिजे आहे त्यांनी प्रत्येक वर्षी अपिंडक असे भरणी श्राद्ध करावे .

स्त्रियांचे भरणी श्राद्ध करावे काय? 
भरणी श्राद्ध पुरुषस्यैव विधेयं न तु स्त्रिय : इति वदंति तदसत्। 
यत : प्रेतशब्दे प्रइत:प्रेत:इण धातो रूपमिदं परलोकगत : इत्यर्थं: परलोकगमनं तु उभयोरप्यास्तयैव न तु पुंस: एव।। 
अतः प्रेतशब्द: उभयवाचित्वात भरणी श्राद्ध स्त्रियोरपि कार्य।। 
अर्थ 
वरील वचनावरून प्रेत शब्द उभयवाचि असल्याने व प्रेत या शब्दाचा अर्थ परलोकगमन व ते स्त्री व पुरुष दोघांचेही असल्याने स्त्री पुरुष असा भेद न करता स्त्रियांचेही भरणी श्राद्ध करावेच. 

थोडक्यात स्त्री असो वा पुरूष मृत झाल्यापासून प्रथम वर्षश्राद्धाच्या पूर्वी भाद्रपद कृष्णपक्षामध्ये भरणी श्राद्ध करावे तसेच ज्यांना गया श्राद्धाचे विशेष फल पाहिजे असेल त्यांनी प्रतिवर्षी अपिंडक भरणी श्राद्ध करावे.


- ज्योतिष विशारद 
वेद. शास्त्र. संपूर्ण. पंडित. श्री दामोधर बंडु घेवारे
 ( शास्त्री)  
त्र्यंबकराज ज्योतिष कार्यालय 
मु. पो. लहवित तालुका जिल्हा नाशिक 
मो ९६५७६३५०११

पंढरपूर लाईव्ह या लोकप्रिय ई-न्युज वेब पोर्टल आणि यु-ट्युब चॅनलवर जाहिराती व बातम्या प्रसिध्द करण्यासाठी संपर्क साधा. 
मोबा. 8149624977

Post a Comment

0 Comments