राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचेकडून कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांना आदरांजली... पंतांच्या प्रमाणेच चांगले काम करा- आमदार प्रशांतराव परिचारक यांना दिला सल्ला माजी आमदार व जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक यांचे मागील महिन्यात निधन झाल्याने आज राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा देशाचे जेष्ठ नेते शरदचंद्र पवार यांनी परिचारक यांच्या वाड्यात येऊन त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून श्रद्धांजली वाहिली.
आज श्री. पवार यांनी सुधाकरपंतांविषयीच्या अनेक आठवणींना उजाळा देत त्यांचे ज्येष्ठ बंधू व आमदार प्रशांत परिचारक यांचे वडील ऍड. प्रभाकरराव परिचारक आणि परिचारक कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी ते म्हणाले की, शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या विषयी सुधाकरपंतांच्या समवेत आपली अनेक वेळा चर्चा व्हायची. शेतकऱ्यांच्या विषयी त्यांना कमालीचा जिव्हाळा होता. सहकारी संस्थांचा कारभार कशा पद्धतीने करावा याचे सुधाकरपंत हे उत्तम उदाहरण होते. त्यांच्या अनेक आठवणी आहेत. त्यांच्या पश्चात मोठी जबाबदारी तुमच्यावर असून, पंतांच्या प्रमाणेच चांगले काम करा, असा सल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आमदार प्रशांत परिचारक यांना दिला.
या वेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार भारत भालके, आमदार बबनराव शिंदे, सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे, युटोपियन शुगरचे अध्यक्ष उमेश परिचारक, युवा नेते प्रणव परिचारक, महेश परिचारक उपस्थित होते.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
Adv. रस्त्यावरील विक्रेत्यांना मिळणार 10 हजार रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज... केंद्रशासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी! पथविक्रेत्यांसाठी विशेष सुक्ष्म पतपुरवठा सुविधा योजना!
0 Comments