श्राद्धाचे महत्त्व आणि श्राद्ध का करावे ?
प्रतिवर्षी श्राद्ध विधी करणे हा हिंदु धर्मातील एक महत्त्वाचा आचारधर्म असून त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे पुराणकाळापासून चालत आलेल्या या विधीचे महत्त्व आणि त्याची आवश्यकता या लेखातून आपण जाणून घेऊया.
श्राद्ध करणे हा धर्मपालनाचाच भाग असणे
देव ऋषी आणि समाज या तीन ऋणांसह पित्रृऋण फेडणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे पितरांविषयी आदर बाळगणे त्यांच्या नावे दानधर्म करणे आणि त्यांना संतोष होईल अशी कृत्ये करणे हे वंशजांचे कर्तव्य आहे. श्राद्ध करणे हा धर्मपालनाचा एक भाग आहे .
पितर त्यांच्या पुत्रांनी पिंडोदक ( पिंड आणि उदक) दिल्यावरच सुखी आणि संतुष्ट होतात या संदर्भात पुत्र कोणाला म्हणावे याविषयी महाभारतात दिलेल्या श्लोक पुढीलप्रमाणे आहे.
पुन्नाम्नो नरकाद्यस्मात त्रायते पितरं सुत: ।
तस्मात्पुत्र इति प्रोक्त: स्वयमेव स्वयम्भुवा ।।
महाभारत १,७४,३९
अर्थ - मुलगा हा आपल्या पितरांचे ( पूर्वजांचे)
पुं नामक नरकापासून रक्षण करतो : म्हणून त्याला
स्वत: ब्रम्हदेवानेच पुत्र म्हटले आहे या श्लोका
नुसार पितरांना सद्गती लाभावी. त्यांना भोगाव्या लागणाऱ्या अनंत यातनांतून त्यांची सुटका व्हावी आणि पितरांना पितृलोकातून वंशावर कृपादृष्टी ठेवावी यासाठी पुत्राने श्राद्धादी विधी करावेत.
आता आपण जाणून घेऊ श्राद्ध केव्हा करावेत ?
मृत व्यक्ती चा ज्या वेळी मृत्यु झाला त्या वेळेस जि तिथी असते भाद्रपद महिन्यात पित्रृपक्षात त्या तिथीला त्या मृत व्यक्तीचे श्राद्ध करावे.
दाते पंचांग अनुसार या वर्षी येणाऱ्या श्राद्ध तिथी कधी व किती आहे ते बघू
१) ०२/०९/२०२० प्रतिपदा श्राद्ध करावे
२) ०३/०९/२०२० द्वितीय श्राद्ध करावे
३)०५/०९/२०२० तृतीया श्राद्ध करावे
४)०६/०९/२०२० चतुर्थी श्राद्ध करावे
५)०७/०९/२०२० भरणी श्राद्ध पंचमी श्राद्ध करावे
६)०८/०९/२०२० षष्ठी श्राद्ध करावे
७)०९/०९/२०२० सप्तमी श्राद्ध करावे
८)१०/०९/२०२० अष्टमी श्राद्ध करावे
९)११/०९/२०२० अविधवा नवमी नवमी श्राद्ध करावे
१०)१२/०९/२०२० दशमी श्राद्ध करावे
११)१३/०९/२०२० एकादशी श्राद्ध करावे
१२)१४/०९/२०२० द्वादशी श्राद्ध करावे
१३)१५/०९/२०२० त्रयोदशी श्राद्ध करावे
१४)१६/०९/२०२० चतुर्दशी श्राद्ध करावे
१५)१७/०९/२०२० सर्वपित्री अमावास्या
ज्यांना कोणाला मृत व्यक्तीची मृत तिथी माहीत
नाही त्यांनी सर्वपित्री अमावास्या ला श्राद्ध करावे
ज्योतिष विशारद
वेद. शास्त्र. संपूर्ण. पंडित. श्री दामोधर बंडु घेवारे
(शास्त्री) त्र्यंबक राज ज्योतिष कार्यालय
मु.पो. लहवित ता. जि. नाशिक
मो ९६५७६३५०११
0 Comments