सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण विभागात आजपर्यंत एकुण 29248 जण कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आलेत, यापैकी आजपर्यंत एकुण 852 जणांचा मृत्यू झालाय. आज एकुण 121 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढ झालेली आहे.. पंढरपूर तालुक्यामध्ये आज शहरात 8 तर ग्रामीणमध्ये 18 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत.
आजतागायत पंढरपूर तालुक्यातील एकुण रूग्णसंख्या 5779 एवढी झाली असुन यापैकी 153 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आजपर्यंत 5169 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर सध्या एकुण 457 जणांवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
सध्या सोलापूर जिल्हा ग्रामीण विभागातील एकुण 3312 रूग्णांवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आजपर्यंत एकुण 25214 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
0 Comments