“फेब्रुवारी-२०२० मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परिक्षेत “कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर” चे यश”

 

           महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद, पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी – २०२० मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये “कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर” या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे यश संपादन करुन प्रशालेचे नाव उज्ज्वल केले आहे.

          इयत्ता ५ वी साठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये एकूण प्रशालेचे १० विद्यार्थी पात्र झाले आहेत. तसेच इयत्ता ८ वी साठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये एकूण ४ विद्यार्थी पात्र झाले आहेत.  या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन प्रशालेच्या प्राचार्या सौ शैला परेश कर्णेकर तसेच रजिस्ट्रार श्री गणेश वाळके  केले व या शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाट्चालीस शुभेच्छा दिल्या.

          या शिष्यवृत्ती परीक्षेतील विद्यार्थ्यांना इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वीच्या सर्व शिक्षक व शिक्षिकांनी मार्गदर्शन केले   सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments