पंढरपूर: प्रतिनिधी कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयामध्ये एन. बी.ए. च्या संदर्भात ऑनलाईन पद्धतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते हि कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
एन. बी. ए. ची मार्गदर्शक तत्त्वे ही व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी नेहमीच योग्य दिशा देणारी असतात. पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय मागिल काही वर्षांपासून तंत्रशिक्षामध्ये उत्कृष्ट काम करीत आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास, आधुनिक तंत्रशिक्षण तसेच जागतिक पातळीवर असणारी सक्षमता या अनुषंगाने एन.बी.ए. च्या मार्गदर्शक सुचनांचा फायदा महाविद्यालयात होतो. या दृष्टिकोनातून महाविद्यालयाच्या प्राध्यापकांच्या माहिती मध्ये व ज्ञानामध्ये भर पडावी या हेतूने या ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

ही कार्यशाळा तीन सञांमध्ये घेण्यात आली. पहिल्या सञांमध्ये वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. शशिकांत हलकुडे यांनी व्हिजन व मिशन निश्चिती संदर्भामध्ये महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. यादरम्यान वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरींग विभाग प्रमुख डाॅ. सचिन गेंगजे यांनी कोर्स आउटकम व प्रोग्राम आउटकम मॅपिंग या संदर्भात महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेत सोलापूर सिंहगड इन्स्टिट्यूट, पंढरपूर सिंहगड इन्स्टिट्यूट सह इतर महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग सहभागी झाले होते. या कार्यशाळेचे समन्वयक म्हणून डाॅ. अल्ताफ मुलाणी यांनी काम पाहिले तर सहभागी प्राध्यापकांचे आभार सोलापूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले यांनी मानले.
फोटो ओळी: पंढरपूर सिंहगड च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एन. बी. एन. च्या ऑनलाईन कार्यशाळेत सहभागी प्राध्यापक वर्ग.
0 Comments