लायन्स,लायनेस व ईनरव्हील संस्थेकडून कोव्हीड हॉस्पिटल साठी सॅनिटायझर स्टँड

 






लायन्स,लायनेस क्लब पंढरपूर व इनरव्हील क्लब पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कोव्हीड हॉस्पिटल साठी सॅनिटायझर स्टँड देण्यात आले. 
          पंढरपूर नगरपरिषद संचलीत ६५ एकर कोविड सेंटर, उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर, MIT कोविड सेंटर पंढरपूर येथे या तिन्ही कोव्हीड सेंटरला संस्थेच्या वतीने सॅनिटायझर स्टँड देण्यात आले. लायन्स संस्थे कडून सॅनिटायझर स्टँडचे प्रायोजकत्व पंढरपुरातील बांधकाम व्यावसायिक ला.शार्दूल नलबिलवार यांनी केले.
             मा.नगीना बोहरी यांनी कोव्हीड कालावधी मध्ये नागरिकांची काळजी धेतल्या बद्दल प्रशासनाचे, आशा कर्मचारी यांचे आभार मानले, ईनरव्हील संस्था गरजु व्यक्ती व संस्थाला मदत करत आली आहे यापुढेही मदत करु असे सांगितले व नुकतेच कोव्हिड सेंटरसाठी व्हील चेयर देण्यात आले असल्याचे सांगितले. अध्यक्ष सुजाता गुंडेवार व पल्लवी माने यांनी कोव्हीडच्या कामासाठी नगरपालिकेचे कर्मचारी, फिल्ड वर काम करणारे कर्मचारी, सफाई कर्मचारी, नागरी हिवताप विभागाचे कर्मचारी व आशा कर्मचारी यांचे आभार मानले व लायन्स,लायनेस संस्थच्या वतीने कोव्हीड काळामध्ये गरजुंना, प्रशासनाच्या मार्गदर्शनानुसार मदत केली आहे व यापुढेही मदत करेल असे सांगितले. 
              नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांनी कोणतीही स्पर्धा न करता लायन्स संस्था व ईनरव्हील संस्था एकत्रीत येउन काम करत असल्याने दोन्ही संस्थेचे कौतुक केले व समाधान व्यक्त केले. आरोग्य सभापती विवेक परदेशी यांनी सांगितले की आपल्या गावातील नेमकी गरज शोधुन फिल्डवर जाउन ती पुर्ण करण्याचे काम  लायन्स संस्था व ईनरव्हील संस्था करत आली आहे. याचा खुप मोठा आधार गरजवंतांना असल्याचे सांगितले.     
              मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तालुका वैद्यकीय अधिकारी एकनाथ बोधले, उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर, डॉ प्रदिप केचे, डॉ प्रसन्न भातलवंडे यानीं लायन्स, लायनेस संस्था व इनरव्हील संस्थेचे आभार मानले व  सांगितले की कोव्हीड च्या कालावधी मध्ये पंढरपुरातील सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती यांनी वेळोवेळी मदत केली आहे व करत आहेत. 
             कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ला.ललिता कोळवले यांनी केले तर आरोग्य समितीचे सभापती विवेक परदेशी यांनी आभार व्यक्त केले.
           कार्यक्रमासाठी इनरव्हील क्लबच्या संस्थापिका मा.नगीना बोहरी,लायन अध्यक्षा ला.डॉ.सुजाता गुंडेवार,लायनेस अध्यक्षा ला.डॉ.पल्लवी माने, सामाजिक कार्यकर्ते नवनाथ रानगट,ला.विवेक गुंडेवार, ला.रा.पां.कटेकर, ला.कैलास करंडे,ला.शार्दूल नलबिलवार,इनरव्हील सेक्रेटरी वैशाली काशिद ,आशा गटप्रवर्तक अपेक्षा कुलकर्णी हे मान्यवर उपस्थित होते.

Adv. रस्त्यावरील विक्रेत्यांना मिळणार 10 हजार रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज... केंद्रशासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी! पथविक्रेत्यांसाठी विशेष सुक्ष्म पतपुरवठा सुविधा योजना!

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
   हहह

Post a Comment

0 Comments