लोकनेत्याला जड अंतःकरणाने दिला अखेरचा निरोप... स्वाभिमानी आमदार भारतनाना भालके अनंतात विलीन! शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार

 Pandharpur Live : पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे लोकप्रियआमदार भारतनाना भालके यांच्या पार्थिवावर आज शनिवार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी दुपारी सरकोली, ता. पंढरपूर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.





यावेळी आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांची धडपड चालु होती. आज आमदार भारतनाना भालके यांना अखेरचा निरोप देताना आकाश सुध्दा भरून आले होते... दाटलेल्या कंठाने आसमंतात एकच निनाद उठला होता... भारतनाना अमर रहे.... आमदार भारतनाना भालके यांनी आपल्या कारकिर्दीत मायेनं जोडलेल्या असंख्य जनसामान्यांचा हुंकार आणि भरून आलेलं आभाळ बरंच काही सांगत होतं... पुन्हा असा लोकनेता होणे नाही... पंढरपूर लाईव्ह कडून नानांना भावपूर्ण आदरांजली...

पंढरपूर, दि. २८ : पंढरपूर-मंगळवेढा विधासभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके (६० वर्षे)  यांच्या पार्थिवावर सरकोली येथे आज  शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामाम अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा मुलगा भगिरथ भालके यांनी पार्थिवाला मुखाग्नी दिला.

 आमदार भारत भालके यांचे काल रात्री पुणे येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांचे पार्थिव आज दुपारी पंढरपूर येथे आणण्यात आले. त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी पंढरपूर येथे नागरिकांनी गर्दी केली होती. पंढरपूर येथे सरगम चौक, सावरकर चौक, शिवाजी चौक, प्रदक्षिणा मार्ग, कालिका देवी चौक यामार्गे त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. विठ्ठल सहकारी साखर कारखाना (गुरसाळे ता.पंढरपूर) व मंगळवेढा येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी  ठेवण्यात आले होते.

सरकोली येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार भालके यांना आदरांजली वाहिली. पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार  प्रशांत परिचारक, संजय शिंदे, यशवंत माने,  प्राणिती शिंदे, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार दीपक साळुंखे, नारायण पाटील, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, प्रांताधिकारी सचिन ढोले, उदयसिंह भोसले, तहसिलदार वैशाली वाघमारे, स्वप्निल मरोड, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांच्यासह सहकार, राजकीय क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते. अंत्यसंस्कारावेळी पोलीसांच्या वतीने हवेत तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.

यसिंह भोसले, तहसिलदार वैशाली वाघमारे, स्वप्निल मरोड, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांच्यासह सहकार, राजकीय क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते. अंत्यसंस्कारावेळी पोलीसांच्या वतीने हवेत तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.



lll


Post a Comment

0 Comments