@ पंढरपूर सिंहगडची प्लेसमेंट दमदार वाटचाल ! १२ विद्यार्थ्यांची “क्यु स्पाईडर” कंपनीत निवड

 पंढरपुर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याची “क्यु स्पाईडर” या आयटी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कंपनीत एकूण १२ विद्यार्थ्याची निवड कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

        पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात घेण्यात आलेल्या कॅम्पस मुलाखती मधून इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागातील सुप्रिया कुलकर्णी, ऋषिकेश जगताप, श्रेयश कुलकर्णी, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील हनुमंत गोफणे, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील प्राची भिंगे, स्नेहल गाजरे, अनुपमा सावंत, अमृता कुलकर्णी, प्रतीक्षा कुलकर्णी, ऋतुजा पवार, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील तृप्ती बाबर, अदिती बडवे आदी विद्यार्थ्याची निवड करण्यात आली आहे.

          “क्यु स्पाईडर” कंपनीची निवड प्रक्रिया पंढरपूर सिंहगड कॉलेज मध्ये घेण्यात आली यामध्ये विद्यार्थ्यांना कंपनीत निवड होण्यासाठी आवश्यक असलेले गुण, शैक्षणिक गुणवत्ता, शिस्त आदी गुण विद्यार्थ्यांमध्ये दिसून आले. शिक्षण पुणे होताच विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळत असल्यामुळे विद्यार्थी व पालक वर्गातून आनंद व्यक्त होत आहे.
         “क्यु स्पाईडर”  कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग ऑफिसर डॉ. राजश्री बाडगे, प्लेसमेन्ट ऑफिसर प्रा. समीर कटेकर, डॉ. चेतन पिसे डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. श्रीगणेश कदम, प्रा. नामदेव सावंत, प्रा. श्रीनिवास गंजेवार, डॉ.अल्ताफ मुलाणी, प्रा. दिपक कोष्टी प्रा. ऋषिकेश देशपांडे, प्रा. सुर्यकांत पाटील आदी सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments