पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते संविधानाच्या प्रास्ताविकेच्या फलकाचे अनावरण ; बिबट्याबाबत कसल्याही प्रकारे अफवा पसरवू नये पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन

 


            पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेच्या फलकाचे आज अनावरण झाले. सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात हा कार्यक्रम झाला. यावेळी आमदार प्रणिती शिंदे, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष शेलार, शाखा अभियंता राजशेखर जेऊरकर आदी उपस्थित होते.


बिबट्याबाबत कसल्याही प्रकारे अफवा पसरवू नये -पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन
 सोलापूर, दि. ११: करमाळा तालुक्यात अधिवास असणाऱ्या बिबट्याबाबत नागरीकांनी काळजी घ्यावी. तसेच बिबट्याबाबत कसल्याही प्रकारे अफवा पसरवू नये, असे आवाहन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुद्देशिय सभागृहात जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांची बैठक झाल. त्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. व्यासपीठावर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी आदी उपस्थित होते. याबैठकी नंतर त्यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी बोलताना हे आवाहन केले. 


त्यांनी सांगितले की, नरभक्षक बिबट्यास ठार मारण्याची परवानगी मिळाली आहे. त्यानुसार वनविभागाकडून बिबट्यास जेरबंद करण्याची त्याचबरोबर ठार मारण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. वनविभागाच्या पथकांना यामध्ये लवकरच यश मिळेल. वनविभागाच्या अंदाजानुसार तीन ते चार बिबट्या असण्याची शक्यता आहे. श्री.सिद्धरामेश्वर यात्रेबाबत अहवाल राज्यशासनाकडे पाठविला जाईल. 

त्यानंतर यात्रेबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे ही त्यांनी सांगितले. कोरोना विषाणूचा संसर्ग आटोक्यात येत आहे. मात्र दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेवून सर्व विभागांनी सतर्कता बाळगावी , अशा सूचनाही श्री. भरणे यांनी दिल्या. बैठकीस अधिष्ठात डॉ.संजीव ठाकूर, अधीक्षक अभियंता संतोष शेलार, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, जिल्हा प्रशासन अधिकारी पंकज जावळे, अतिरिक्त शक्यचिकित्सक मोहन शेगर आदी उपस्थित होते. संविधानाच्या प्रास्ताविकेच्या फलकाचे अनावरण पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेच्या फलकाचे आज अनावरण झाले. सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात हा कार्यक्रम झाला. यावेळी आमदार प्रणिती शिंदे, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष शेलार, शाखा अभियंता राजशेखर जेऊरकर आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments