राज्यातील नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे पगार न झाल्याने दिनांक 29 डिसेंबर 20 20 रोजी राज्यातील सर्व नगरपरिषद कर्मचारी बोंबाबोंब आंदोलन करणार -सुनील वाळुजकर

Pandharpur Live :- महाराष्ट्रातील सर्व नगर परिषदांना कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर व्हावी या हेतूने शासनाने कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सहाय्यक वेतन अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला सर्व शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच नगर परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन होणे आवश्यक आहे.
Advet.  

...............

परंतु शासनाकडून वेतनासाठी मिळणारी सहाय्यक अनुदानाची रक्कम वेळेवर न मिळाल्याने या महिन्यांमध्ये अद्याप पर्यंत कर्मचाऱ्यांचे पगार झालेले नाहीत. सध्या कोरोनाच्या काळात हेच सर्व नगरपरिषद कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून गेल्या सात आठ महिन्यापासून काम करीत आहेत परंतु शासनाकडून गेल्या दोन  वर्षापासून सहाय्यक वेतन अनुदानाची रक्कम प्रत्येक महिन्याच्या वीस तारखे नंतर दिली जाते, त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार हा 23 24 तारखेला होतो परंतु चालू डिसेंबर महिन्यामध्ये आज 24 तारीख होऊन गेली तरी सुद्धा शासनाकडून अद्याप पर्यंत सहाय्यक वेतन अनुदानाची रक्कम महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषदाना दिली गेली नाही.

 त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व नगर परिषद कर्मचारी वेतनापासून वंचित राहिला आहे त्यामुळे प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला सहाय्यक वेतन अनुदान मिळावे म्हणून  शासनाचे  या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी  व  डिसेंबर महिन्याचे सहाय्यक वेतन अनुदानाची रक्कम सोमवार दिनांक 28 डिसेंबर 2020 पर्यत न मिळाल्यास 29 डिसेंबर 20 20 पासून महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषद कर्मचारी आपल्या आपल्या नगर परिषदेसमोर अनुदानाची रक्कम नगरपरिषदाना  मिळेपर्यंत बोंबाबोंब आंदोलन करणार असल्याची माहिती राज्याचे अध्यक्ष  डॉ डी एल कराड  व  सरचिटणीस सुनील वाळुजकर व पुणे  विभागाचे अध्यक्ष  प्रा  ए बी पाटील यांनी दिली.

................


Post a Comment

0 Comments