आद्यस्वयंभु शक्तीपीठ सप्तशृंगी माता मंदिर 24 तास दर्शनासाठी खुले

Pandharpur Live Online | आद्यस्वयंभु शक्तीपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगी माता मंदिर येथे दरवर्षी प्रमाणे नूतनवर्ष निमित्ताने दर्शनार्थी भाविकांची होणारी गर्दी विचारात घेता विश्वस्त संस्थेने श्री भगवती मंदिर भाविकांना २४ तास दर्शनासाठी सुरू ठेवणे बाबतचा निर्णय घेतला आहे. 
३१ डिसेंबर २०२० रोजी रात्री श्री भगवती मंदिर भाविकांना दर्शनासाठी सुरू राहणार असून, भाविकांनी कोविड-१९ संदर्भीय आवश्यक त्या खबरदारीसह अति गर्दी टाळून सामाजिक अंतर जपावे, मास्क व सॅनिटायझरचा वापर करूनचं मंदिरात प्रवेश करावा. तसेच गर्दी टाळणेकामी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे. असे आवाहन विश्वस्त संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Pandharpur Live 

............. Adv .............

Post a Comment

0 Comments