तिघांचे बळी घेणार्‍या नरभक्षक बिबट्याचा खेळ अखेर खल्लास! वनविभाग आणि शार्प शूटर यांचे ‘मिशन बिबट्या शूट आऊट’ सक्सेस!

Pandharpur Live : बर्‍याच प्रयत्नांती वनविभाग आणि शार्प शूटर यांचे ‘मिशन बिबट्या शूट आऊट’ अखेर सक्सेस झाले असुन अखेर करमाळा तालुक्यात तीन जणाचे बळी घेणार्‍या नरभक्षक बिबट्याचा खेळ अखेर खल्लास झाला. शुक्रवार दि. 18 डिसेंबर रोजी सायंकाळी बिबट्या ठार झाल्याने करमाळावासीयांनी जल्लोष केला. वांगी नंबर चार, राखुंडे वस्ती (ता. करमाळा) चार येथे शार्प शूटरने बिबट्यावर गोळ्या घालून बिबट्याला ठार केले.

3 डिसेंबर रोजी फुंदेवाडी (रायगांव) येथे बिबट्याने ज्वारीला पाणी देण्यासाठी गेलेले कल्याण फुंदे यांना ठार केले, तर 5 डिसेंबर रोजी अंजनडोह येथील जयश्री शिंदे या लिंबोणीच्या बागेत लिंबे गोळा करण्यासाठी गेल्या असता त्यांच्यावर हल्ला करत बिबट्याने त्यांनाही ठार केले. तर 7 डिसेंबर रोजी चिखलठार (ता. करमाळा) येथे ऊसतोडणी मजुराची आठ वर्षीय मुलगी फुलाबाई हरिचंद हिच्यावर हल्ला केला. तिला उपचारासाठी कुटीर रुग्णालयात पोचवण्यापूर्वीच तिचे निधन झाले.

Advet.  

...............

या एकापाठोपाठ घडलेल्या घटनांमुळे करमाळावासीय भयभीत झाले होते. त्यानंतर बिबट्याने अधूनमधून दर्शन देत नागरिकांच्या मनातील भीती कायम ठेवली होती. त्यानंतर भिवरवाडी (ता. करमाळा) येथे बिबट्याने सोमवारी (ता. 14) पहाटे तीनच्या सुमारास अनिल गोरख आरकिले यांच्या गोठ्यात बांधलेल्या गाय व वासरावर हल्ला केला. या हल्ल्यात वासराचा मृत्यू झाला तर गायीच्या मानेवर व गळ्यावर बिबट्याने हल्ला केल्याने गाय बेशुद्ध पडली.

त्यानंतर बिबट्याचे दर्शन झाले नाही. वनविभागासह शार्प शूटर, ड्रोन कॅमेरे, डॉग स्क्वाड आदी लवाजमा बिबट्याला पकडण्यासाठी किंवा जंग-जंग पछाडलेला असताना शेवटी आज (शुक्रवारी) बिबट्याला ठार मारण्यात यश आले.

Post a Comment

0 Comments