पत्रकार संरक्षण समिती व पत्रकार सुरक्षा समिती यांचे संयुक्त विद्यमाने पत्रकार दिन उत्साहात संपन्न

पंढरपूर (प्रतिनिधी):

आद्यपत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी पत्रकार संरक्षण समिती व पत्रकार सुरक्षा समिती या दोन्ही संघटनांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनाचा कार्यक्रम नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले यांचे अध्यक्षतेखाली पत्रकार भवन पंढरपूर येथे दि. 6 जानेवारी रोजी उत्साहात संपन्न झाला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीविठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, डीव्हीपी उद्योग समुहाचे अभिजित पाटील, युवकनेते भगिरथदादा भालके, युवानेते प्रणवदादा परिचारक व माहिती कार्यालयाचे अविनाश गरगडे तसेच मर्चंट बँकेचे चेअरमन नागेशकाका भोसले यांचेसह  पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष भगवान वानखेडे, पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष जाकीर नदाफ, पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष यशवंत कुंभार आदी मान्यवर तसेच दोन्ही संघाचे माजी अध्यक्ष, पदाधिकारी व पत्रकार बांधव उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी कोरोनाच्या संकटकाळात दुःखद निधन झालेले पंढरपूर तालुक्यातील राजकीय नेते माजी आमदार कर्मयोगी स्व. सुधाकरपंत परिचारक, आमदार स्व. भारतनाना भालके, राष्ट्रवादीचे नेते स्व. राजूबापू पाटील तसेच ह.भ.प.वै. रामदास महाराज जाधव, भागवताचार्य वै. वा.ना.महाराज उत्पात, पत्रकार स्व. संजय वाईकर यांना आदरांजली वाहण्यात आली.
 यानंतर स्वराज्य दिनाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन व पत्रकार दिनानिमित्त आद्यपत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांचा सत्कार पत्रकार दत्ताजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांचा सत्कार पत्रकार अपराजित सर्वगोड यांच्या हस्ते करण्यात आला. उद्योजक अभिजीत पाटील यांचा सत्कार पत्रकार डॉ. राजेश फडे  यांच्या हस्ते करण्यात आला.    माहिती कार्यालयाचे अधिकारी अविनाश गरगडे यांचा सत्कार पत्रकार विरेंद्रसिंह उत्पात यांच्याहस्ते करण्यात आला. मर्चंट बँकेचे चेअरमन नागेश भोसले यांचा सत्कार पत्रकार अविनाश साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आला तर युवक नेते भगीरथ भालके यांचा सत्कार पत्रकार रामचंद्र सरवदे यांनी केला.

यानंतर पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष भगवान वानखेडे यांचा सत्कार युवानेते प्रणव परिचारक यांनी केला. पत्रकार सुरक्षा समितीचे नूतन अध्यक्ष यशवंत कुंभार यांचा सत्कार उद्योजक अभिजीत पाटील यांनी केला, तर पत्रकार संरक्षण समितीचे नुतन अध्यक्ष जाकिर नदाफ यांचा सत्कार मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांच्या हस्ते करण्यात आला.
 तसेच दोन्ही संघांच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष भगवान वानखेडे यांनी पंढरीतील पत्रकार बांधवांच्या गृहनिर्माण सोसायटीचा प्रश्न व पत्रकारांचा विमा उतरवण्याचा प्रश्न उपस्थित केला. व यासाठी सर्वच राजकीय नेते मंडळी व प्रशासकीय अधिकारी यांनी तातडीने प्रयत्न करावेत अशी विनंती केली.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार देशपांडे, राजेश शिंदे, पत्रकार दिनेश खंडेलवाल, हरिभाऊ प्रक्षाळे, विकास पवार, संजय कोकरे, यांचेसह   पत्रकार सुरक्षा समितीचे उपाध्यक्ष विजयकुमार कांबळे, सहसचिव विश्वास पाटील, प्रसिद्धीप्रमुख अमर कांबळे, बाहुबली जैन, चैतन्य उत्पात, रामकृष्ण बिडकर, संजय यादव, कबीर देवकुळे, मारुती वाघमोडे,राधेश बादले- पाटील, भैरवनाथ कडाळे, खानसाब मुलानी, प्रकाश सरताळे, राजेंद्र काळे, सोहन जैस्वाल तसेच पत्रकार संरक्षण समितीचे कार्याध्यक्ष तानाजी जाधव, उपाध्यक्ष संतोष कांबळे व शंकरराव कदम, सचिव शंकरराव पवार, सहसचिव, नामदेव लकडे, प्रसिद्धी प्रमुख लखन साळुंखेे, माजी उपाध्यक्ष उमेश टोमके, सदस्य तानाजी सुतकर, डॉ. शिवाजी पाटोळे, गणेश देशमुख, जैनुद्दीन मुलाणी, गौतम जाधव, धीरज साळुंखे, आनंद भोसले, गणेश गायकवाड, संजय हेगडे, अशोक पवार, सुदर्शन खंदारे, नवनाथ खिलारे आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र शेवडे यांनी केले. तर आभार रामचंद्र सरवदे यांनी मानले.

*पंढरपूर शहर व तालुक्याला विकासाच्या टप्प्यावर नेण्यासाठी पत्रकारांची साथ मोलाची -  नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले*
पंढरपूर शहर व तालुक्याला विकासाच्या टप्प्यावर नेण्यासाठी पत्रकारांची साथ आणि योगदान मोलाचं आहे. त्यामुळे पत्रकारांनी ब-या वाईट घटनांवर परखडपणे व्यक्त होणं आवश्यक असल्याचं मत पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केलं.

*पत्रकारांचा जज बनण्याचा प्रयत्न नसावा..जी वस्तुस्थिती आहे ती समाजासमोर मांडावी - विठ्ठल जोशी (कार्यकारी अधिकारी श्रीविठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती)*
हल्लीच्या काळात काही पत्रकारांचा जज बनण्याचा प्रयत्न असतो, तसे न करता जी वस्तुस्थिती आहे ती समाजासमोर मांडावी असे मत श्रीविठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी व्यक्त केले. 


*पंढरपूरचं मार्केटिंग आणि ब्रँडींग पत्रकारांनी करणं अत्यावश्यक- उद्योजक अभिजीत पाटील
पंढरपूरचं मार्केटिंग आणि ब्रँडींग पत्रकारांनी करणं अत्यावश्यक आहे. त्याद्वारे पंढरपूर ची बलस्थान पुढं आणणं आणि तिर्थक्षेत्र पंढरपूर ची व पांडुरंगाची महती ठळकपणे प्रसिद्ध करणं काळाची गरज असल्याचं मत डीव्हीपी उद्योग समुहाचे अध्यक्ष उद्योजक अभिजीत पाटील यांनी व्यक्त केलं.
यावेळी पंढरपूर तालुक्यातील पत्रकारांचा विमा उतरवण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं.


*पत्रकारिता हाच समाजमनाचा आरसा... पत्रकारांच्या लेखणीतून व्यक्त होणा-या विचारांवर जनसामान्यांचा अधिक विश्वास- युवा नेते भगिरथदादा भालके*
पत्रकारिता हाच समाजमनाचा आरसा असतो म्हणून पत्रकारांच्या लेखणीतून व्यक्त होणा-या विचारांवर जनसामान्यांचा अधिक विश्वास असतो. असे मत श्रीविठ्ठल कारखान्याचे चेअरमन युवा नेते भगिरथदादा भालके यांनी व्यक्त केलं. 


*अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्याची व सत्य समोर आणण्याची भुमिका पत्रकारांनी पार पाडावी - युवानेते प्रणवदादा परिचारक* 
पंढरपूर चे पत्रकार बांधव परखडपणे पत्रकारिता करतात. अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्याची व सत्य समोर आणण्याची भुमिका अशाच पध्दतीने पत्रकारांनी पार पाडावी.
असे मत युवानेते प्रणवदादा परिचारक यांनी व्यक्त केलं.

Post a Comment

0 Comments